Work from home memes : कोविड महामारीने आपल्या सगळ्यांचेच कंबरडे मोडले. मागच्या दोन वर्षांपासून आपण कोविडशी सामना करत आहोत. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लसीकरण झाल्यामुळे काही प्रमाणात कोविडची बाधा फिकी पडू लागली आहे. आधी जनता कर्फ्यू, मग अनेक बंधने आपण पाळली. घराबाहेर पडताना काळजी घेण्याच्या सरकारने सूचना केल्या. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. आता इतरांशी संपर्क नको म्हणून अनेक ऑफिसेसनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले. खरे तर कोविडनंतर घरून काम करण्याचा ट्रेंडच आला असे म्हणायला हवे. कोविड आता कमी झाला असला तरी कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांनी घरून काम करणे फायद्याचे ठरत आहे. पण काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहे. याचविषयावर एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटरवर किशोर कुमारांच्या सिनेमातले एक गाणे ट्विट केले आहे. न्यू दिल्ली या 1956 साली रिलीज झालेल्या सिनेमातले हे गाणे आहे. ‘Arey Bhai Nikal Ke Aa Ghar Se‘ असे या गाण्याचे बोल आहेत. आता हे गाणे आणि गोयंका यांचे ट्विटही व्हायरल झाले आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे गाणे व्हायरल होत असून गोयंका यांनी म्हटले आहे, की सर्व ऑफिसेस त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे इन्व्हिटेशन पाठवत आहेत.
We have sent this video to all our colleagues at office #WFH ? @bang_lalitpic.twitter.com/BpaoArMWv3
— Harsh Goenka (@hvgoenka) March 25, 2022
हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून यूझर्स यावर रिअॅक्ट होत आहेत. अनेकजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मीम्स शेअर करून आता आम्ही वर्क फ्रॉम होममध्येच रमलो असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. काही जण म्हणत आहेत, आम्हाला आमिष दाखवले जात आहे. तर काही जण हा एक उत्तम मेसेज असल्याचे म्हणत आहेत.
Most employees enjoy WFH. They are not looking forward to going back to this daily grind:https://t.co/pElAW2Egb5
— Sergio Pereira ? (@SergioRocks) March 25, 2022
???? pic.twitter.com/HkHP8wJLOS
— Anil Bhatia (@yourwellwisher3) March 25, 2022
Hahaha… चारा डाला जा रहा है ??
— Chhaya Jain (@chhayajolly) March 25, 2022
Hummm, an indirect message to all employees to be on job
— Saajeev (@DesanaLiving) March 25, 2022