सोन्याचा डोसा कधी खाल्लाय का ? किंमत ऐकाल तर…
डोशांच्या विविध रेसीपी खवय्यांची तृष्णा भागवत असतात. परंतू एका डोशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा डोसा आहे सोन्यापासून बनलेला डोसा...24 कॅरेट सोन्याचा डोसा कुठे मिळतो ते पाहूया
हैदराबाद : सकाळच्या नाश्त्यात जर गरमागरम डोसा खायला मिळाला तर काय मजा येते ना..साधा डोसा, मसाला डोसा, नीर डोसा, रवा डोसा, पेपर डोसा अशा अनेक प्रकारांचा डोसा ( DOSA ) आता सर्व जगात फेमस झाला आहे. ही साऊथ इंडीयन डीश ( SOUTH INDIAN DISHES ) आता साऊथ इंडीयन राहीलेलीच नाही. सर्व भारतीयांची फेव्हरेट डीश ठरली आहे. हा डोसा जर सोन्यापासून बनत असेल असे सांगितले तर तुम्हाला खरे वाटेल का हो ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे…चला तर पाहूया..
गोल्डन डोशाची चमक
अण्णाच्या गाडीवर मिळणारा डोसा आपल्या सर्वांनाच प्रिय असतो. अण्णाच्या गाडीपासून ते हॉटेलपर्यंत डोशांची किंमत वाढत जाते. या डोशाची किंमत फार तर 30 रूपयांपासून सुरू होऊन 250 रूपयांपर्यंत असू शकते. परंतू जर डोशाची किंमत हजार रूपये चुकवावी लागली तर तुम्ही म्हणाल की सोने लावले की काय तर हे खरेच आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये हा सर्वात महागडा डोसा मिळतो.सोन्याचा डोसा खाण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये अक्षरश: झुंबड उडालेली असते. आणि विकेण्डला तर येथे मुंगी शिरायलाही जागा नसते. या ‘हाऊस ऑफ डोसा’ मध्ये गोल्डन डोशाची चमकच लोकांना त्याच्याकडे खेचून आणतेय…
24 कॅरेट सोन्याने सजवले जाते
तव्यावर मस्त गोलाकार डोसा तयार झाल्यावर या डोशाला 24 कॅरेट सोन्याने सजवले जाते. हे सोन्याचे कोटींग या डोशाची किंमत ठरवते. या डोशातच्या डीशमध्ये तळलेले काजू, बदाम, शुद्ध तुप, भाजलेले शेंगदाणे तसेच चणाडाळसर हा डोसा सर्व्ह केला जातो. ग्राहकांच्या ऑर्डर नूसार गोल्ड कोटेट डोसा बनवला जातो. रेस्टॉरंटमध्ये दर दिवसाला 6 ते 8 डोसे असे बनवले जातात.
आतापर्यंतची महागडी डीश
आतापर्यंतच्या महागड्या डीशेच्या मध्ये या सोन्याच्या डोशाचा समावेश झाला आहे. 2021 मध्ये न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमधील सर्वात महागड्या फ्रेंच फ्राईजने आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. या डीशची किंमतच 200 अमेरिकन डॉलर इतकी होती.