Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात लांब जिभेचा माणूस पाहिलाय का ? जिभेने पेटींग देखील करतो…

एखाद्याची जिभ फार चालते असे आपण म्हणतो परंतू अमेरिकेच्या या माणसाची जिभ सर्वात लांब असून त्याने तो चित्रंही काढतो.

जगातील सर्वात लांब जिभेचा माणूस पाहिलाय का ? जिभेने पेटींग देखील करतो...
LONG-TONGUEImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 7:17 PM

नवी दिल्ली : आपण एखाद्याला म्हणतो की याच्या जिभेला काही हाडच नाही किंवा याच्या जिभेला काही लगामच नाही. परंतू अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका माणसाची जिभ ( LongTongue ) इतकी लांब आहे की तुम्ही खरोखरच त्याच्या जिभेला लगाम लावू शकत नाही. बर नुसत्या लांब जिभेचाच रेकॉर्ड त्याच्या नावावर नाही तर या लांब जिभेचा वापर करून तो पेंटींग देखील करीत आहे. त्याने एका टीव्ही शो दरम्यान आपल्या जिभेने चित्रे काढण्याचा पराक्रमही केला आहे.

या अजब माणसाचे नाव निक स्टोबर्ल असे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणारा हा माणूस खूपच विरला आहे. मिडीया रिपोर्टनूसार या निकची जिभ चक्क 3.97 इंच लांब  आहे, जगातील सर्वात लांब जिभ असल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. निक अमेरिकन सरकारमध्ये सरकारी नोकरी देखील करतो. त्याने एका टीव्ही शो दरम्यान आपल्या जिभेने चित्रे काढण्याचा पराक्रमही केला आहे.

लांब जिभेचे खूप काही फायदे

मेट्रो डॉट कॉमच्या रिपोर्टनूसार निक याने आपल्या जिभेचा वापर करून कॅनव्हासवर टीव्ही शोचे यजमान फिलिप शॉफिल्ड आणि हॉली विलोबी यांचे चित्र ही काढून सर्वांची वाहवा मिळविली. निकला अधिकृत रित्या जगातीस सर्वात लांब जिभेचा माणूस म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने गौरविले आहे. या लांब जिभेचे काही फायदे असल्याचे तो सांगतो. लोक माझ्या नेहमी बोलायचा प्रयत्न करीत असतात. मला ओळखतात. दुसऱ्याला माझी ओळख सांगतात, त्यामुळे मला स्टार झाल्याचे वाटते असे निक प्रांजळपणे सांगतो.

जगभर होत आहे व्हायरल

मला लांब जिभेसाठी मला जगभरात ओळखले जाते. त्यासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदल्याचे ते सांगतात. जेव्हा जेवायचे असेल तर नॅपकीनची आवश्यकता लागत नाही असे निक गंमतीने म्हणतो. जेवणाचे ताट आपण झटपट चाटून पुसून स्वच्छ करू शकतो असे त्याने सांगत स्व:तावरच विनोद केला आहे.

तामिळनाडूतील विरुथुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथील रहिवासी असलेले के. प्रवीण  याची जीभ भारतात सर्वात लांब आहे. प्रवीण हा बी.ई. रोबोटिक्स (B.E. Robotics) शाखेचा विद्यार्थी आहे.  प्रवीणने जिभेसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये  स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  स्थान मिळावे यासाठी प्रविण खास प्रशिक्षण घेत आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.