Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddaramaiah Dance Video : अरे म्हणजे जबराटच! सिद्धरामय्या यांच्या डान्सचे तुम्ही पण होणार जबरा फॅन!

Siddaramaiah Dance Video : सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्र्यांची शर्यत जिंकली, त्यांच्याच डान्स स्टेपने पण अनेकांना भूरळ घातली आहे. त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Siddaramaiah Dance Video : अरे म्हणजे जबराटच! सिद्धरामय्या यांच्या डान्सचे तुम्ही पण होणार जबरा फॅन!
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:06 PM

नवी दिल्ली : सध्या देशात सर्वात जास्त चर्चा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या नावाची. काँग्रेसने राज्यात एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यात डीके शिवकुमार यांच्यासह सिद्धरामय्या यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसने कर्नाटकात (Karnataka Congress) एकहाती 135 जागा मिळविल्या आहेत. भाजपला आसमान दाखविल्याने ते हिरो ठरले आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्र्यांची शर्यत जिंकली, त्यांच्याच डान्स स्टेपने पण अनेकांना भूरळ घातली आहे. त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ (Siddaramaiah Dance Video) जुना असला तरी तो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक मिश्किल कॉमेंट्स पण पडल्या आहेत.

इतक्या संपत्तीचे आहे धनी सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण 51 कोटींची मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांची पत्नी पार्वती यांच्या नावावर 21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 9 कोटी रुपये सिद्धरामय्या यांच्या नावे तर पत्नीच्या नावे 11 कोटी रुपये आहेत. दोघांच्या नावे 30 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या नावे 9 कोटींची अचल संपत्ती तर पत्नी पार्वतीच्या नावे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या डोई जवळपास 23 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

हे सुद्धा वाचा

ताल-लय एकदम जोरात खरंतर राजकीय पुढाऱ्यांची पाऊलं थिरकत असली तरी त्यांना नृत्य फारसं येत नसल्याचे आपण अनेकदा बघितलं आहे. पण भाजपला धूळ चारणाऱ्या सिद्धरामय्या यांची नृत्यातील पदतालित्य, मुद्रा पाहून तुम्हाला हा डान्स पाहण्याचा मोह आवरणार नाही. या व्हिडिओत सिद्धरामय्या त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांच्यासह बहारदार डान्स करताना दिसत आहेत.

लोकनृत्याचा उत्सव हे लोकनृत्य एकदम बहरले आहे. त्यात सिद्धरामय्या यांच्या स्टेप तर एकदम परफेक्ट पडल्या आहेत. त्यांचे समर्थकही जोरदार नृत्य करत आहेत. त्यांनी या नृत्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी त्यासाठी नृत्य शिकल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात जास्त चर्चिल्या गेली. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी समर्थकांसह हा डान्स केला होता. त्यावेळी हे नृत्य गाजले होते. आता सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला.

20 लाखांहून जास्त व्ह्युज सिद्धरामय्या यांचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर bengaluru.memes नावाच्या आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 दशलक्ष म्हणजे 20 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

चुकून राजकारणात आला की काय सिद्धरामय्या यांचा डान्स पाहून युझर्संनी त्यांना चुकून राजकारणात आला की काय असा सवाल केला आहे. काहींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांचे पदतालित्य अनेकांना आवडले आहे. काहींना त्यांच्या डान्सने भूरळ घातली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.