प्रोटीन मिळावे म्हणून तो चक्क डॉग फूड खाऊ लागला, त्यामुळे झाला असा परिणाम
'डॉग फूड' खाणारा हा काही पहीलाच माणूस नाही. याआधी एका जगप्रसिद्ध टेनिसस्टारनेही साल 2016 मध्ये 'डॉग फूड' खाल्ले होते, त्यामुळे ती आजारी पडली होती.
न्यूयॉर्क : आपली बनविण्यासाठी हल्ली सप्लीमेंट घेतल्या जातात. प्रोटीन पावडरचे डब्बे संपवले जातात. त्यामुळे व्यायाम आणि पूरक आहाराकडे अलिकडच्या तरूणांचा कल असतो. मात्र अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका 21 वर्षीय तरूणाला चक्क डॉग फूड खाण्याचा छंद लागला आहे. त्याने ‘डॉग फूड’ खातानाचा व्हिडीओ देखील बनविला असून तो समाजमाध्यमावर शेअर देखील केला आहे. ‘टीकटॉक’ आपल्या देशात बंद असले तरी जगात अनेक देशात ते सुरू आहे, या टीकटॉकवर हे नवे फॅड सुरू झाले आहे.
अमेरिकेतील बुफालोचा रहिवासी असलेल्या हेनरी क्लेरीसे याने ‘द पोस्ट’ला सांगितले की आपण सुरूवातीला कुत्र्याचे रेडीमेड डॉग फूडचा एक तुकडा चघळला तर मला तो एखाद्या खड्यासारखा लागला. त्याला कसलीही चव नव्हती, अर्थात खाण्याचा लायकीचा अजिबात नव्हता. त्याला चावणे देखील कठीण झाले होते.
‘टीकटॉक’ वर नविन चॅलेंज सुरू झाले आहे, त्यात कुणीही शरीरात प्रोटीन वाढण्यासाठी चित्र – विचित्र पदार्थ खाऊन दाखवित आहेत, हे पदार्थ खातानाचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. या तरूणाने काही तरी हटके करण्याचे हे चॅलेंज स्वीकारले होते. या स्पर्धेत तर एकाने चॉकपासून बनविलेली स्मूदी देखील खाल्ली होती. हेनरी क्लेरीसे याने म्हटले की यापुढे मात्र आपण डॉग फूड कधी खाणार नाही. भले कुत्र्याच्या जेवणात हायप्रोटीन असू दे, परंतू ते कुत्र्याचेच अन्न आहे, माणसाचे नाही.
कुत्र्याच्या अन्नात असते हायप्रोटीन ?
कुत्र्याच्या अन्नाचा प्रसिद्ध ब्रॅंड्स पेडीग्रीच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे की, कुत्र्याचे अन्न हे या पाळीव प्राण्याच्या गरजांनुरूप बनविलेले असते. जर कोणी मनुष्य त्याचे सेवन करीत असेल तर ते धोकादायक आहे. हेनरी याने एक टीकटॉक व्हिडीओ पाहीला होता, त्यात ‘डॉग फूड’ प्रोटीनने परिपूर्ण असल्याचे म्हटले होते. परंतू व्हिडीओमध्ये लोकांनी डॉग फूडमध्ये जरी प्रोटीन भरपूर असले तरी ते माणसांनी न खाण्याचे आवाहनही करण्यात आले होते. परंतू हेनरी याने ते न ऐकता डॉग फूड खाण्याचा आगाऊपणा केला. आणि टिकटॉक चॅलेंज स्वीकारले.
हेनरी याने टिकटॉकवर आवाहन केले होते की जर आपल्या व्हिडीओला पंधरा हजार जरी लाईक्स मिळाले तर आपण डॉग फूड खाऊन दाखवू ! हेनरीसाठी डॉग फूड खाण्याचा अनुभव वाईट आला असला तर त्याच्या व्हिडीओला 28 लाख व्यूज आणि 25 लाख लाईक्स मिळाले. आपण पंधरा हजार लाईक्सचे आवाहन केले होते परंतू आपल्याला 25 लाख लाईक्स मिळाले असल्याने आपण हा ‘डॉग फूड’ खाण्याचे चॅलेंज स्वीकारल्याचे हेनरी याने सांगितले.
सेरेना विल्यम्सने खाल्ले होते डॉग फूड
‘डॉग फूड’ खाणारा हेनरी हा काही पहीलाच माणूस नाही. याआधी टेनिसस्टार सेरेना विल्यम्स हीनेही साल 2016 मध्ये डॉग फूड खाल्ले होते, त्यामुळे ती आजारी पडली होती,तसेच फूड ब्लॉगर सिहान ली याने देखील साल 2020 मध्ये डॉग फूड खाल्ले होते. एकॅडमी ऑफ न्यूट्रीशन एण्ड डायटीटीक्सने बजफिज न्यूजला सांगितले की, कुत्र्याचे अन्न त्याच्या गरजांनूसार तयार केलेले असते. अर्थातच ते मानवाच्या खाण्या योग्य नसते. ‘डॉग फूड’ खाल्ल्याने माणसाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, डॉग फूडच्या काही ब्रॅंडमध्ये विटामिन के आणि विटामिन्स के-3 चे सिंथेटीक रूप सुद्धा असते. ज्याचा हाय डोस मानवाला धोकादायक ठरू शकते.