पोपट म्हणाला…! त्याचे बोल ऐकून मालकाला फुटला घाम, आता घेतला असा निर्णय
पोपट पाळणं मालकाला चांगलंच महाग पडलं आहे. त्याच्या त्या कृतीमुळे आता मालकाला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. लुईस नावाचा पोपट आता डोकेदुखी ठरू लागला आहे.
मुंबई : जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला…हे गाणं तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल. यात पोपटाची बोलण्याची तऱ्हा काय असेल हे कळतं. पोपट पाळणाऱ्यांच्या घरी कधी गेलात त्याच्या आवाजात तुमचं स्वागत देखील झालं असेल. कारण पोपटाला जे शिकवाल तो ते लगेच शिकतो आणि त्याचं अनुकरण करायला लागतो. पण एका मालकाला त्याच्या पोपटाने चांगलाच घाम फोडला आहे. त्याला कारण तसं आहे. हा साधं काही बोलतंच नाही. जे काही बोलायचं आहे ते थेट शिव्यांमध्ये. ब्रिटनमधील हा अजबगजब प्रकार समोर आला आहे. आता ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
ब्रिटनच्या शेफील्डमधील पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लुईस नावाचा आफ्रिकी पोपट डोकेदुखी ठरला आहे. पोपटाची ख्याती सर्वदूर पसरल्यानंतर मालकाला देखील तोंड लपवण्याची वेळ आली. लॅडबिबलच्या रिपोर्यनुसार, हा पोपट पबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करतो.
मालकाने सांगितलं की, पोपटाला हॅलो बोललं तर तो हॅलो बोलून उत्तर देतो. त्यानंतर लगेचच तो शिव्या घालण्यास सुरुवात करतो. लोकांना असं वाटतं की मी त्याला शिव्या घालायला शिकवलं आहे. पण पोपट शिव्या घालताना ऐकून मलाच आश्चर्याचा धक्का बसला. हा शिव्या कुठून शिकला तेच कळत नाही. अखेर मालकाने पोपटाला टीव्ही बघण्यास बंदी घातली आहे.
पबमधील कर्मचाऱ्यांच्या मते लुईस शिवीगाळ केल्यानंतर गप्पही बसत नाही. तो तीच शब्द वारंवार रिपीट करतो. त्यामुळे ग्राहकांसमोर लाज वाटते. त्यामुळे मालकाने त्या पोपटासमोर एक बोर्ड लावला आहे. त्याने शिव्या दिल्या तर वाईट मानू घेऊ नका.