बापरे इतकी मोठी Heatwave की विमानच उडालं नाही, कुठे घडली घटना
विमानाची अनेक तांत्रिक बिघाड आपण ऐकले असतील परंतू हिट व्हेवमुळे विमानाला चार तासांचा उशीर झाल्याचे प्रथमच ऐकले असेल. विमानाच्या धावपट्टीवरील उष्णतेने हे विमान पुन्हा टोईंग करुन टॅक्सीवेने पार्किंग एरियात नेण्यात आल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली.
विमान प्रवास करताना अनेकदा अनेक कारणांनी विमानांचे शेड्यूल बिघडते. कधी पक्षांची धडक तर कधी प्रवाशांचे विचित्र वागणे तर कधी विमानतळावरच एका प्राणी येण्याने विमाने फार तर लेट होत असतात. परंतू राजधानी दिल्लीत सध्या तापमान इतके प्रचंड वाढले आहे की धावपट्टी अनैसर्गिकपणे प्रचंड तापल्याने विमानात अचानक बिघाड झाल्याने हे विमान चार तास लेट उडाले. तोपर्यंत विमानातील 165 प्रवाशांची अवस्था काय झाली असेल हे विचार करवत नाही.
देशातील मान्सून अजूनही म्हणावी तसा जोर पकडलेला नाही. त्यातच उत्तरेकडील दिल्लीतील तापमान 50 डिग्री सेल्सिअस इतकं वाढले आहे की या हिट व्हेवचा फटका विमानांनाही बसू लागला आहे. फ्लाईटला देखील अतितीव्र उ्ष्ण लाट सहन झाली नसावी, त्यामुळे हे विमान धावपट्टीवरुन पुन्हा टॅक्सीवेने पुन्हा पार्कींग वेमध्ये न्यावे लागले. राजधानी दिल्लीतील तापमानाचा प्रचंड धसका आता मानव आणि प्राण्यांबरोबरच विमानांनी देखील घेतला की अशी परिस्थिती आहे. सोमवारी दिल्ली ते बागडोगरासाठी उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या एका विमानाच्या प्रवाशांना चार तासांच्या उड्डाण विलंबाचा त्रास सहन करावा लागला.
चार तास रखडपट्टी प्रवासी कातावले
दिल्ली विमानतळावर flight 6E 2521 हीचे उड्डाण दुपारी 2.10 वाजता होता. परंतू असा काही बिघाड निर्माण झाला की विमानाने सायंकाळी 6.15 वाजता चार तास उशीराने उड्डाण घेतले. सर्व 165 प्रवासी विमानात स्थानापन्न झाल्यानंतर ग्राऊंड लेव्हलचे तापमान प्रचंड वाढल्याने विमान उड्डाण घेण्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. विमान उड्डाण घेऊ शकत नाही म्हटल्यावर त्याला माघारी टोईंग करुन टॅक्सीवे ने पार्कींग एरियात आणले. त्यानंतर बिघाडाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कळले की तापमान प्रचंड वाढल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. अखेर विमानाची दुरुस्ती सुरु झाली. या दरम्यान चार तास एकाच जागी विमानातील प्रवाशांना बसून रहावे लागल्याने ऑक्सिजनच्या अभावी एका प्रवाशाला गुदमरायला झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना विमानाला उशीर होणार असल्याचे कंपनीने किंवा महाराष्ट्र सरकारने कळविले नसल्याचा आरोप एक्सवर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी केला आहे.