Food video : खाद्यपदार्थांशी संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावरचा एक महत्त्वाचा कप्पा आहे. इथे रोज हजारो व्हिडिओ अपलोड होतात. त्यातले अनेक व्हिडिओ आवडीने पाहिले जातात. हेच व्हिडिओ मग व्हायरल होतात. आपल्याला माहीत नसलेले असे वेगळे पदार्थ या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतात. एकदा का व्हिडिओ आपल्यासमोर आला, की तो आपण पाहतो. तर हौशी लोक तो पदार्थ घरी ट्राय करून पाहतात. मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय आणि आम्ही तुम्हाला ज्याविषयी सांगतोय, तो पदार्थ कदाचित तुम्ही घरी ट्राय करण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण हा आहेच तेवढा वजनदार पदार्थ… होय वजनदार. रेसिपीचे (Recipe) नाव आहे ऑम्लेट (Omlette). तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? तर मित्रांनो, हे ऑम्लेट साधेसुधे नाही तर चक्क 40 अंड्यांपासून बनवलेले आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक स्ट्रीट फूडविक्रेता सांगतोय, की आपण आता अंड्याची रेसिपी करत आहोत. मी तुम्हाला 40 अंड्यांचे ऑम्लेट तयार करून दाखवणार आहे. हे याआधी तुम्ही कधीही खाल्लेले नसणार, याची मला खात्री आहे. मग हा विक्रेता अंडी फोडून एका भांड्यात टाकतो, दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवतो. चीझ, कांदा, मिरची गरम करतो. त्याचबरोबर अंडीही चांगली फेटून घेतो. अशाप्रकारे ऑम्लेट तयार करून त्यावर चीझ आणि इतर वस्तू टाकून सजवतो.
यूट्यूबवर आर यू हंग्री (ARE YOU HUNGRY) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 2 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 6.8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ’40 EGG का OMLETTE देख के हैरान रहे जाओगे’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. यूझर्स यावर कमेंट्स करत आहेत. त्या वाचण्यासारख्या आहेत. यामुळे हॉस्पिटमलमध्ये जावे लागेल, असेच बहुतेकजण म्हणत आहेत. (Video courtesy – ARE YOU HUNGRY)