या कोंबडीसमोर सोन्याची देखील लाजेल, 1 दिवसात दिले 31 अंडे, पशुसंवर्धन विभाग हादरला
गोष्टीतल्या नव्हे, तर खऱ्या खुऱ्या कोंबडीनं एका दिवसात 31 अंडी दिली आहे. कदाचित ही बातमी वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी आहे. कोबंडीने एकाच दिवशी 31 अंडी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मुंबई : तुम्ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीची गोष्ट ऐकली असेलच. लहानपणी आपल्याला गोष्टीतल्या कोंबडीचं कायमच कौतुक राहिलं असेल. नेमकं त्या कोंबडीच्या पोटात काय असेल? की सोन्याची अंडी देत असेल. असाच आश्चर्याचा धक्का तुम्हाला ही बातमी वाचताना बसणार आहे. कारण गोष्टीतल्या नव्हे, तर खऱ्या खुऱ्या कोंबडीनं एका दिवसात 31 अंडी दिली आहे. कदाचित ही बातमी वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी आहे. कोबंडीने एकाच दिवशी 31 अंडी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही घटना उत्तराखंडमधील बासोटमधील असून या कोबंडीचा मालक गिरीश चंद्र बुधानी हा आहे. टूर्स अँड ट्रॅव्हेल्समध्ये काम करणाऱ्या गिरीशनं स्वत:च याबाबतची माहिती एका युट्यूब चॅनेलला दिली आहे. आता या कोबंडीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचबरोबर व्हायरल व्हिडीओत 31 अंडीही दाखवण्यात आली आहेत. व्हायरल बातमीनंतर पशुसंवर्धन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.
गिरीश चंद्र बुधानी यांनी सांगितलं की, मुलांच्या सांगण्यावरून मी दोन कोंबड्या पाळल्या. खरं तर कोंबडी दिवसाला एक किंवा जास्तीत जास्त दोन अंडी देते. पण रविवारी माझ्या एका कोंबडीने एकानंतर एक अशी 31 अंडी दिली. 12 तासात 31 अंडी दिलेली कोंबडी व्यवस्थित आहे. मागच्या 10 दिवसात कोंबडीने 52 अंडी दिली आहेत.
कोबंडीला खाद्य दिलं याबाबत गिरीशला प्रश्न विचारल्यानंतर त्याने सांगितलं की, “तिला आधी जे खाणं देत होतो तेच ती आताही खात आहे. पण कोंबडी लसूण आणि शेंगदाणे आवडीने खाते.” व्हायरल व्हिडीओनंतर पशुपालन विभाग आश्चर्यचकीत झाला आहे. पशुपालन अधिकाऱ्यांनी गिरीशची भेट घेतली. याबाबत विचारपूस केल्यानंतर गिरीशनं सांगितलं की, कोंबडीला काही कॅल्शियमचे डोस देतो कारण ती अशीच अंडी देत राहील.