HIDE AND SEEK : मुलगा खेळत होता लपाछपी, सहा दिवसांनी वेगळ्याच देशात सापडला, काय झाले नेमके पाहा
ज्यावेळी कंटेनरमधून कोण तरी दरवाजावर धपडा मारत आहे. हे अधिकाऱ्यांनी ऐकले तेव्हा तो उघडण्यात आला. त्यानंतर त्याची सूटका करण्यात आली, त्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर फिरत आहे.
ढाका : तो खेळत होता लपाछपीचा खेळ, लपला आणि सहा दिवसांनी थेट वेगळ्या देशात सापडला, नेमके असे कसे घडले हे पाहणे रंजक आणि तितके मती गुंग करणारे आहे. आपला शेजारील बांग्लादेशात ही खळबळजनक घटना घडली आहे. त्याचे काय झाले एका पंधरा वर्षीय मुलाने लपा छपी खेळताना जी जागा निवडली त्यामुळ हा प्रताप घडला आहे. काय झाले नेमके ते पाहा.
डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानूसार बांग्लादेशचा फहीम हा पंधरा वर्षीय मुलगा लपाछपीचा खेळात असा काही रंगला की त्याला त्याची शुद्धच राहिली नाही त्याचे काय झाले, त्याने लपताना फार मोठी चूक केली. 11 जानेवारी रोजी एका शिपिंग कंटेनरमध्ये तो लपला. त्याला नंतर त्यात झोप लागली आणि मग काय गडबडच झाली की राव..तो कंटेनर निघाला प्रवासाला.
फहीम झोपलेला कंटेनर पॅक करण्यात येऊन तो कार्गो सर्व्हीसद्वारे आपल्या प्रवासाला निघाला. 11 जानेवारी रोजी हा कंटेनर बांग्लादेशातून निघाला. फहीमला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने आतून खूप आरडा ओरड केली. परंतू काहीच उपयोग झाला नाही, त्याला कोणीच सोडवायला आले नाही ,कारण त्याचा आवाजच कोणाला ऐकू आला नाही. त्यामुळे कंटेनर त्याच्या मुक्कामी पोहचल्या शिवाय त्याला कोणी बाहेर काढलेच नाही. त्यामुळे सहा दिवस बिचारा अन्न पाण्याशिवाय उपाशीच राहिला. त्याला डीहायड्रेशन झाले भुकेने जीव व्याकुळ झाला.
मलेशियाच्या क्लँग बंदरात हे जहाज पोहचल्यावर त्या कंटेनराला उघडले तेव्हा भूकेने रडताना अधिकाऱ्यांना तो सापडला. ज्यावेळी कंटेनरमधून कोण तरी दरवाजावर धपडा मारत आहे. हे अधिकाऱ्यांनी ऐकले तेव्हा तो उघडण्यात आला. त्यानंतर त्याची सूटका करण्यात आली, त्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर फिरत आहे.