Road accident video : …अन् ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडकला ट्रक, अपघाताचा थरारक Video Viral

Shocking road accident : रस्त्यावरून चालताना प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. रस्त्यावरील वाहन अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू (Death) भारता(India)त होतात. त्यामुळे सावध (Aware) राहणे आवश्यक आहे. एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Road accident video : ...अन् ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडकला ट्रक, अपघाताचा थरारक Video Viral
ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिली धडक
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:04 AM

Shocking road accident : रस्त्यावरून चालताना प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही पायी चालत असाल किंवा गाडीने… प्रत्येकाने रस्त्यावर चालताना काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा अपघातही होऊ शकतो. आजकाल किती रस्ते अपघात होत आहेत याची तुम्हाला जाणीव असेलच. गेल्या वर्षी जागतिक बँकेचा एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते, की रस्त्यावरील वाहन अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू (Death) भारता(India)त होतात. त्यामुळे सावध (Aware) राहणे आवश्यक आहे आणि विशेषतः अशा लोकांपासून जे रस्त्यावर जास्त वेगाने आणि बेदरकार वाहन चालवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मागून एक भरधाव ट्रक आला आणि ट्रॅक्टर चालकाला धडकला. यात ट्रॅक्टर चालकाची चूक नव्हती, असे दिसत आहे.

जोरात धडक

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टर त्याच्या बाजूने जात आहे, तर एक ट्रक त्याच्या मागून भरधाव वेगाने येतो आणि त्याला मागून जोरात धडकतो. हा व्हिडिओ धक्कादायक आहे, कारण ट्रक चालकाने ज्या वेगाने ट्रॅक्टरला धडक दिली, त्याच वेगाने तो तिथेच उलटला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाची प्रकृती कशी आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला दुखापत झाली असणार, हे अपघाताच्या तीव्रतेवरून समजते.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jayesh_jangid_rj04 या आयडी नावाने शेअर करण्यात आला आहे आणि ‘सावधानी हटी दुर्घटना घटी’ असे कॅप्शन लिहिले आहे. या आश्चर्यकारक व्हिडिओला आतापर्यंत 7.7 मिलियन म्हणजेच 77 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे.

ट्रॅक्टर चालकाला झाली दुखापत

हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की चूक नसणारा ट्रॅक्टरवाला विनाकारण मारला गेला’, तर दुसऱ्या यूझरने ट्रॅक्टरवाला वाचला नसणार, धोकादायक अपघात झाला आहे, अशी कमेंट केली आहे. मात्र, ज्या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्याने कमेंटमध्ये सांगितले आहे, की ट्रॅक्टर चालकाला काहीही झाले नाही, त्याला थोडी दुखापत झाली आहे.

लोखंडी तारांच्या कुंपणावरून कसा चपळाईनं पळतोय बिबट्या? पाहा Leopard Viral Video

Viral : देसी जुगाड करून महिलेनं ‘असा’ पकडला साप, आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला Poisonous Snake Video

Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.