Hijab : खान सिस्टर्सचा जलवा, एका बुलेटवर Hijab घालून चौघीजणी करतायत flying kiss; हा Video पाहिलात का?
Bhopal hijab viral video : हिजाबचा वाद कर्नाटका(Karnataka)तून आता मध्य प्रदेशात पोहोचलाय. राजधानी भोपाळ(Bhopal)मध्ये हिजाब घातलेल्या बायकर्स मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. खान सिस्टर्स(Khan sisters)चा हा व्हिडिओ आहे. यातले काही व्हिडिओ जुनेदेखील आहेत.
Bhopal hijab viral video : हिजाबचा वाद कर्नाटका(Karnataka)तून आता मध्य प्रदेशात पोहोचलाय. राजधानी भोपाळ(Bhopal)मध्ये हिजाब घातलेल्या बायकर्स मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. खान सिस्टर्स(Khan sisters)चा हा व्हिडिओ आहे. यातले काही व्हिडिओ जुनेदेखील आहेत. एक व्हिडिओ 24 नोव्हेंबर 2020ला अपलोड करण्यात आलाय. ज्याला इन्स्टाग्रामवर _khan_sisters_नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. जे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातला एक व्हिडिओ भोपाळच्या एका व्हीआयपी रोडवरचा तर दुसरा श्यामला हिल्स परिसरातला आहे. व्हीआयपी रोडच्या व्हिडिओत बायकर्स एक बुलेट आणि एक स्पोर्ट्स बाइक चालवताना दिसून येतात. दोन्हीच्या मागे बुरखा घातलेल्या दोघी दिसतायत. या व्हिडिओवरून राज्यात वातावरण काहीसं तापलंय. नेमकं काय झालंय, व्हिडिओ कधीचे, नेत्यांचं कायं मत आहे. ते पाहू या…
काही व्हिडिओ जुने
या व्हिडिओत मागे बसलेल्या दोन मुली फ्लाइंग किसही देताना दिसून येत आहेत. दुसरा व्हिडिओ जो श्यामला हिल्स परिसरातला आहे, ज्यात एकाच बुलेटवर चारजणी बुरखा घातलेल्या दिसत आहेत. अद्याप या व्हिडिओवरून अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये काही जुने व्हिडिओ आहेत. तर एक व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. तो आता व्हायरल होतोय.
आरोप-प्रत्यारोप
काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी याविषयी म्हटलंय, की मुली जी बाइक चालवत आहेत, तिची नंबरप्लेट भाजपाच्या रंगात रंगलीय. यासंबंधी ट्विट करत ते म्हणाले, की काय हे सर्व भाजपा प्रायोजित आहे? तर मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, की सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ कधीचे याबद्दल सांगणं कठीण. एकूणच कर्नाटकात वाद सुरू असताना या व्हिडिओंमुळे कोणता वाद होणार, हे पाहावं लागेल.
आणखी वाचा :