2024 मध्ये Google मध्ये कुणाचा सर्वाधिक शोध घेण्यात आला? यादीत एक फ्लॉप अभिनेत्रीही…

2024 मध्ये जगभरात गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत हिना खान आणि निमरत कौर यांचा समावेश आहे. हिना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याने आणि निमरत कौरने ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाबाबत केलेल्या दाव्यांमुळे त्यांची नावे सर्वाधिक शोधली गेली. या यादीत इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे.

2024 मध्ये Google मध्ये कुणाचा सर्वाधिक शोध घेण्यात आला? यादीत एक फ्लॉप अभिनेत्रीही...
हिना खान हिने शेअर केलेल्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय.
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 3:47 PM

अवघ्या काही दिवसात जुन्या वर्षाला निरोप द्यावा लागणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अख्खी दुनिया सज्ज झाली आहे. नवीन वर्ष साजरं करण्यासाठीचा प्रत्येकजण प्लान करत आहे. नवीन नवीन स्पॉट शोधत आहेत. एन्जॉय कसं करता येईल आणि खासकरून कुटुंबासोबत कसा दिवस घालवता येईल याचा प्लान करत आहेत. पण काही लोकं गेल्यावर्षाचा आढावा घेताना दिसत आहे. या वर्षाने काय दिलं? काय घेतलं? याबद्दल अनेक लोक विचार करत आहेत.

लोकच नाही तर गुगलही गेल्या वर्षीच्या घटनांचा आढावा घेत आहे. गुगलने 2024ची एक यादी तयार केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षात म्हणजे 2024मध्ये कोणत्या विषयांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, कोणत्या व्यक्ती, ठिकाणं, जेवण, रेसिपी, खेळ, गाणी, संगीतकार शोधले गेले याचा या यादीत समावेश आहे. जगभरातील आणि देशानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कोणत्या गोष्टीत अधिक होता. त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या हे समजणं सोपं झालं आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, मनोरंजन क्षेत्रातील 2024 मध्ये सर्वाधिक (वर्ल्डवाइड) सर्च केलेली व्यक्ती म्हणून भारताच्या दोन अभिनेत्रींचं नाव आलं आहे. मात्र, या यादीत दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय किंवा आलिया भट्ट यांचं नाव नाही, त्याऐवजी इतर दोन अभिनेत्रींचं नाव आहे. गुगलने जाहीर केलेल्या यादीनुसार, 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या 10 अभिनेता-अभिनेत्रींमध्ये फ्लॉप अभिनेत्री हिना खान आणि निमरत कौर यांचंही नाव आहे.

यादीत असलेल्या इतर व्यक्ती क्रमवारीनुसार :

केट विल्यम्स

पवन कल्याण

अॅडम ब्रेडी

एला पर्नेल

हिना खान

कायरन चुलकिन

टेरेंस हावर्ड

निमरत कौर

शाटन फॉस्टर

ब्रिगेट बज्जो

हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज दे आहे. सोशल मीडियावरवरून ती तिच्या आरोग्याबाबत अनेक वेळा अपडेट्स शेअर करत असते. हिना खानने अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे आणि काही चित्रपटात देखील काम केलं आहे. दुसरीकडे, निमरत कौर सध्या चर्चेत आहे, पण ती कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजमुळे नाही, तर काही इतर कारणांमुळे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होईल असा आरोप तिने केला होता. यामुळे, हिना खान आणि निमरत कौर यांचे नाव 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या 10 प्रमुख व्यक्तींच्या यादीत सामील झालं आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.