हाती घेऊन अक्षरं गिरवण्यास शिकलो, ती पेन्सिल तयार होते तरी कशी? पाहा ‘हा’ Informative short video

Informative video : क्रिएटीव्हीटीची (Creativity) आणि कौशल्यपूर्ण माहिती देण्याची सोशल मीडियावर (Social media) काही कमी नाही. एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पेन्सिल (Pencil) कशी तयार होते, याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) होतोय.

हाती घेऊन अक्षरं गिरवण्यास शिकलो, ती पेन्सिल तयार होते तरी कशी? पाहा 'हा' Informative short video
पेन्सिल कशी तयार करतात, त्याविषयी व्हायरल झालेला व्हिडिओImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 8:30 AM

Informative video : क्रिएटिव्हीटी (Creativity) आणि कौशल्यपूर्ण माहिती देण्याची सोशल मीडियावर (Social media) काही कमी नाही. विविध विषयांवरचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जसे की लहान मुलांचे, त्यांच्या अभ्यासाचे, खेळ आदींचे व्हिडिओ आपण पाहत असतो. अभ्यास करण्यासाठी आपण वही, पुस्तक, पेन, पेन्सिल अशा वस्तूंचा वापर करत असतो. पण यातली पेन्सिल आपण पहिल्यांदा हाती घेतलेली असते. ही पेन्सिल कशी बनवतात, याचा विचार कधी केलाय का? ही आपल्या सुरुवातीच्या काळात आपल्याला लिहायला शिकवणारी महत्त्वाची वस्तू होती. त्यामुळे ती महत्त्वाचं शैक्षणिक साहित्यामधली एक आहे. यावरचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पेन्सिल (Pencil) कशी तयार होते, याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तो सध्या व्हायरल (Viral) होतोय.

कमी वेळात अधिक माहिती

व्हिडिओमध्ये अत्यंत कमी वेळात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलीय. पेन्सिल कशी तयार करतात, याविषयी केवळ 59 सेकंदांत सांगण्यात आलंय. सुरुवातीला लाकडांच्या छोट्या चकत्यांना पेन्सिलच्या आकारात कापलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा भाग असतो लेड. त्यासाठी ग्रॅफाइटमध्ये पाणी मिसळून त्याला एकत्र केलं जातं. त्यानंतर त्याला विशिष्ट तापमानात गरम केलं जातं आणि नंतर वाळवलं जातं. त्यामाध्यमातून पातळ आणि लांब लेड तयार केले जातात. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे लाकूड आणि लेड यांचं एकत्रिकरण… त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला लागेल.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर राइट टू शिक्षा (Right to Shiksha) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 27 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पेंसिल कैसे बनाते हैं?’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना केवळ 59 सेकंदांत महत्त्वाची माहिती मिळाली असल्यानं व्हिडिओला लाइक्स मिळत आहेत. (Video courtesy – Right to Shiksha)

आणखी वाचा :

खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना ‘असं’ वाचवते सिंहिण, Video viral

…अन् भर मांडवातच वधू-वराची Fighting, वराला कशामुळे आला राग? पाहा Viral video

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.