Extra Marital Affair | तो खऱ्या आयुष्यात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील अजय देवगण बनला, पण इथे ऐश्वर्याने….

| Updated on: Jul 07, 2023 | 1:50 PM

Extra Marital Affair | सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शिवमंदिरात एक जोडप विवाहबद्ध होतय. यावेळी महिलेचा पती तिथे हजर होता. त्याने खूप मोठं मन दाखवलं.

Extra Marital Affair | तो खऱ्या आयुष्यात हम दिल दे चुके सनम चित्रपटातील अजय देवगण बनला, पण इथे ऐश्वर्याने....
Hum Dil De Chuke Sanam in Real Life
Image Credit source: social media
Follow us on

पटना : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ 1999 साली ब्लॉकबस्टर ठरला होता. आज या चित्रपटाला 23 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. अभिनेता सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. सलमान इटलीहून ऐश्वर्याच्या वडिलांकडे संगीत शिकायला येतो. त्यावेळी दोघे प्रेमात पडतात. पण ऐश्वर्याच्या वडिलांनी तिचं लग्न पेशाने वकील असलेल्या अजय देवगण बरोबर लावून दिलं.

अजय देवगणला जेव्हा पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल समजतं, तेव्हा तो मोठं मन दाखवतो. पूर्व प्रियकर सलमानशी तिने सुखाने संसार करावा, यासाठी ऐश्वर्याला घेऊन इटलीला जातो. आज या चित्रपटाच कथानक आठवायला कारण आहे, ती बिहारमधील एक घटना.

चित्रपट आणि रिअल लाइफमध्ये फरत इतकाच आहे की….

बिहारच्या नावादा जिल्ह्यात एका माणसाने असंच मोठ मन दाखवलं. त्याने त्याच्या बायकोची तिच्या प्रियकराशी भेट घडवून आणली व तिचं लग्न लावून दिलं. चित्रपट आणि रिअल लाइफमध्ये फरत इतकाच आहे की, ऐश्वर्या परतून अजय देवगणकडे येते. पण इथे वास्तवात संबंधित मुलीने तिच्या प्रियकरला निवडलं.

कपाळामध्ये सिंदूर भरतो

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शिवमंदिरात एक जोडप विवाहबद्ध होतय. यावेळी महिलेचा पती तिथे हजर होता. संबंधित प्रियकर महिलेच्या कपाळामध्ये सिंदूर भरतो. लोक ही सगळी घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद करतायत. प्रियकर कपाळावर सिंदूर लावताना महिला रडताना दिसतेय.

प्रियकराला भेटण्यासाठी रात्री उशिरा त्याच्या घरी गेली

नवरा कामावर असताना महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी रात्री उशिरा त्याच्या घरी गेली होती, त्यावेळी हे प्रेम प्रकरण समोर आलं. दुर्देवाने दोघांना त्यांच्या कुटुंबियांनी पकडलं. त्यांनी प्रियकराला मारहाण केली व दोघांना बंधक बनवून ठेवले. संतप्त ग्रामस्थांनी दोघांना गाव सोडून जाण्यास सांगितलं. महिलेचा पती घरी आला, त्यावेळी त्याला या सगळ्याबद्दल समजलं. तो दोघांना घेऊन मंदिरात गेला व तिथे त्यांचं लग्न लावून दिलं.