Divorces | पती-पत्नीला हवाय घटस्फोट, कारणं तर फारच अजब..

Divorces | घटस्फोटासाठी साधारण दोघांमधील विसंवाद हे प्रमुख कारण असतं. दोघांमधील कुरबुर वाढत जाऊन वादा टोकाला जातात. एका छताखाली रहाणे जमत नाही. मग दोघेही स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतात. पण एका महिला वकिलाने घटस्फोटासाठी कोणती कारणं समोर आली आहेत, त्याची यादीच सर्वांच्या पुढ्यात ठेवली आहे. काय आहेत अत्यंत अजब कारणं

Divorces | पती-पत्नीला हवाय घटस्फोट, कारणं तर फारच अजब..
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 6:01 PM

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : एका छताखाली रहायचं म्हणजे भांड्याला भाडं लागणारच. पती-पत्नीमधील कुरबुर काही कमी नसतात. कशावरुन ना कशावरुन दोघांमध्ये वाजतेच. काही आपसातच ही गोष्ट निपटवतात. काही घरं तर रणांगणच असतात. तिथे रोज भाड्यांची दणआपट सुरु असते. तर वाद टोकाला जातात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते. पण मुंबईतील या महिला वकिलाने घटस्फोटासाठी कोणती कारणं असतात, याची यादीच समोर आणली आहे. काही कारण तर इतकी किरकोळ आहेत की तुम्ही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत. ही यादी वाचून काही महिलांनी डोक्याला हात लावला आहे. तर नवरोबांना आता करावं तरी काय असं झालं आहे. प्रकरण आहे तरी काय?

नकोसं झालंय हे प्रेम

तर तान्या अपाचू कौल असं या महिला वकिलांचं नाव आहे. त्या वकील तर आहेतच पण कंटेंट क्रिएटर पण आहेत. अनेकजण महिलांवरील अत्याचार आणि घटस्फोटासाठी पितृसत्ताक पद्धतीला जबाबदार धरतात. पण या महिला वकिलांनी घटस्फोटासाठी जी कारणं समोर आणली, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पती खूपच जास्त प्रेम करतो, असे एक कारण घटस्फोटासाठी असल्याचे कौल यांनी सांगितले. हे अतिरेकी प्रेम नकोसं झाल्याने काही महिलांना नवऱ्याकडून घटस्फोट हवा असल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर शेअर केली यादी

महिला वकील कौल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर घटस्फोटाची कारणं समोर केली आहे. त्यांनी खास वकिली शैलीत घटस्फोटाची कारण समोर केली आहे. त्यांनी मुद्देसुद मांडणी केली आहे. घटस्फोटासाठी कोणती कारणं समोर आहेत, ते त्यांनी सांगितले. पती अथवा पत्नी या कारणांमुळे घटस्फोट मागतात.

  1. हनिमूनच्या वेळी पतीने अत्यंत वाह्यात ड्रेस आणला.
  2. पती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत बसला, पत्नीसाठी वेळच दिला नाही.
  3. पत्नी पायाच पडली नाही. ती मानच देत नाही.
  4. पत्नीला जेवण तयार करता येत नाही. पती न जेवताच कर्तव्यावर गेला.
  5. इतर पण अनेक किरकोळ कारणं त्यांनी दिली आहेत.

व्हायरल झाली रील

ही रील अत्यंत व्हायरल झाली आहे. इन्स्टाग्रामवर ही रील त्यांनी शेअर केली. ही रील आतापर्यंत 1.6 दशलक्ष युझर्सनी पाहिली आहे. रीलच्या कॅप्शनमध्ये कौल यांनी लिहिले आहे की, मग लग्नच कशासाठी करायचं? या रीलवर युझर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. पती प्रेमच करत नसल्याची अनेक महिलांची तक्रार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.