VIDEO | पती घरात कचऱ्याचा डब्बा विसरुन गेला, पती घरी येताचं पत्नीची लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ व्हायरल
VIRAL VIDEO | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये पत्नी आपल्या पतीला बेदम मारहाण करीत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
मुंबई : पती आणि पत्नीमध्ये नेहमी झगडे (Trending Wife Beating Husband Video) होत असतात, हे लोकांसाठी नवीन नाही. त्याचबरोबर काहीवेळेला घरात पत्नी पती यांच्यात मारामारी सुध्दा पाहायला मिळते. काहीवेळेला रस्त्यात सुध्दा पती आणि पत्नी यांच्यात वाद (Argument between husband and wife) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा घरात एकदा चिडला तर दुसरा शांत राहत असतो. परंतु सध्या जो व्हिडीओ व्हायरल (Trending video) झाला आहे. तो लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यामध्ये एका पत्नीला राग आल्यानंतर तिने नवऱ्याला कशा पद्धतीने मारहाण केली पाहा.
सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ अपलोड होत असतात. त्यामध्ये जे व्हिडीओ चांगले असतात. असे व्हिडीओ लोकांना पाहायला मिळतात. पती घरी गेल्यानंतर संतापलेल्या पत्नीने काय केलंय पाहा. पती गपचूप पत्नीचा मार खात असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पती इतका संयमी कसा काय आहे, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक सुध्दा केलं आहे. व्हायरल व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे त्यावर विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
Wife beats husband immediately after he gets home pic.twitter.com/I32rzrKoQa
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 6, 2023
पत्नीने पतीला बेदम मारला
व्हिडीओत तुम्हाला पाहिला मिळेत की, ऑफिसमधून घरी आलेला पती किती शांत आहे. पत्नी पतीवर डायरेक्ट हल्ला करते. हाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करीत असते. ज्यावेळी पत्नी मारहाण करीत असते. त्यावेळी पती एकदम शांत असतो. त्यांच्या घरी सीसीटिव्ही असल्यामुळे केलेली सगळी मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पती 14 तासांची शिफ्ट करुन घरी पोहोचतो. त्याचवेळी संतापलेली पत्नी त्याला मारहाण करीत आहे. कारण तो घरातून जाताना कचऱ्याचा डब्बा विसरुन गेला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @crazyclipsonly या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत साडेआठ लोकांनी पाहिला आहे.