या पठ्ठ्याला मिळाले ६० पैकी १ मार्क, तरीही हिम्मत बघा.. लोक म्हणाले आता, आई ‘चप्पले’ने करणार स्वागत ! सारांश

Viral Video : एका विद्यार्थ्याला कुठल्या एका विषयात 60 पैकी फक्त 1 मार्क मिळाला आहे. पण तो ज्या स्वॅगसह त्याची उत्तरपत्रिका कॅमेऱ्यात दाखवतोय ते पाहून लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

या पठ्ठ्याला मिळाले ६० पैकी १ मार्क, तरीही हिम्मत बघा.. लोक म्हणाले आता, आई ‘चप्पले’ने करणार स्वागत ! सारांश
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 8:52 PM

नवी दिल्लीः एका शालेय विद्यार्थ्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (On social media) खूप पाहिला जात आहे. वास्तविक, कमी गुण मिळूनही या विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये (In the student video) ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे, ते पाहून इंटरनेटवरील जनता चक्रावून गेली आहे. या विद्यार्थ्याला एका विषयात ६० पैकी फक्त १ गुण मिळाला आहे. पण तो ज्या स्वॅगसह त्याची उत्तरपत्रिका कॅमेऱ्यात दाखवतोय ते पाहून लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. कुणीतरी मुलाला ‘आईची चप्पल’ ची आठवण करून दिली, तर कुणी म्हणतं घरी जा, आई तुझं स्वागत करायला तयार असेल. विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral on the internet) होत आहे. 11 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by @studentz__of_kl

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. त्याचवेळी काही बॅकबेंचर्स मोबाईलवर व्हिडिओ बनवत आहेत. त्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या वर्गशिक्षकाकडे जातो आणि परीक्षेनंतर मिळालेली उत्तरपत्रिका परत आणतो. त्यानंतर विद्यार्थ्याने त्याची उत्तरपत्रिका कॅमेऱ्यासमोर मोठ्या दिमाखात दाखवली, ज्यामध्ये त्याला 60 पैकी फक्त 1 मार्क मिळाले आहेत. कमी गुण मिळूनही या मुलाचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. उच्च माध्यमिक विद्यालय, मट्टम असे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेत, त्याला केवळ १ गुण मिळाल्याचे स्पष्ट दिसते आहे. यावरून हा व्हिडीओ केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मट्टमचा असल्याचे दिसून येत आहे.

मित्र व नातेवाईकांना शेअर केला व्हिडीओ

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर studentz_of_kl नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टॅग करून मित्र आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

एवढा जिगरा कुठून आणलाय भाऊ

व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, भाऊ एवढा जिगरा कुठून आणताय. त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो की भाऊ, जरा जपून घरी जा, कारण तिथं पप्पा तुझी वाट पाहत आहे. दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘भाऊ, एवढ्या कमी नंबरवर एवढा स्वॅग, आईच्या चपलेला घाबरत नाही का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.