Rescue operation video : खडकाळ कड्यावरून 300 फूट खाली कोसळला युवक पण हवाईदलानं वाचवलं, पाहा थरार
Nandi hills rescue operation : नंदी हिल्स येथे खडकाळ कड्यावरून (Steep cliff) 300 फूट खाली अडकलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला रविवारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या (Indian Air Force helicopter) मदतीने वाचवण्यात (Rescue) आले.
Nandi hills rescue operation : नंदी हिल्स येथे खडकाळ कड्यावरून (Steep cliff) 300 फूट खाली अडकलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला रविवारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या (Indian Air Force helicopter) मदतीने वाचवण्यात (Rescue) आले. चिकबल्लापूर पोलीस आणि भारतीय वायूसेनेने संयुक्तपणे बचाव मोहीम (Rescue operation) राबवली. तरूण अडकला होता आणि हलताही येत नव्हता, तरीही या तरुणाने दिल्लीतील पोलीस आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आपल्या अवस्थेबद्दल माहिती दिली. रविवारी पहाटे निशंक शर्मा जो बेंगळुरूमधील PES विद्यापीठातील संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तो त्याच्या बाइकवरून नंदी हिल्स याठिकाणी वीकेंडनिमित्त गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पडल्यानंतर त्याने स्थानिक पोलीस आणि दिल्लीत राहणारे त्याचे कुटुंबीय यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्याचा फोन त्यावेळी सुरू होता.
केला निशंकचा शोध सुरू
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक वासुदेव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने बचाव पथकासह निशंकचा शोध सुरू केला. आम्ही त्याच्याशी बोललो पण तो जिथे अडकला होता तिथे आम्ही उतरू शकलो नाही, असे बचाव पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जेव्हा खडकावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते 30 फुटांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. आम्हाला हे देखील समजले, की त्याच्या दुखापतीमुळे त्याला खडकाळ पृष्ठभागावर आणणे अत्यंत धोकादायक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पाच तासांहून अधिक काळ ऑपरेशन
पोलिसांनी नंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाची मदत घेतली ज्याने भारतीय हवाई दलाशी संपर्क साधून बचाव कार्यासाठी मदतीची विनंती केली. हेलिकॉप्टरसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. क्लिपमधील फुटेजमध्ये बचाव कर्मचारी हेलिकॉप्टरमधून निशंककडे रॅपलिंग करताना दिसत आहेत. पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशनमध्ये ते 19 वर्षीय तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याला तत्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती कारण तो अन्न किंवा पाण्याशिवाय अडकला होता.
‘सुरक्षा उपायांचा अभाव’
चिकबल्लापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मिथुन कुमार जीके म्हणाले, की त्याला येलाहंका हवाई तळावर आणून तेथून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, ट्रेकर्ससाठी नंदी हिल्स हे एक लोकप्रिय ठिकाण आहे, परंतु त्या ठिकाणी सुरक्षा उपायांचा अभाव दिसून येतो. स्थानिक पोलिसांनी सांगितले, की ट्रेकर्सनी मूलभूत सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते आता अधिक काळजी घेत आहेत.
#WATCH Karnataka | Indian Air Force and Chikkaballapur Police rescued a 19-year-old student who fell 300 ft from a steep cliff onto a rocky ledge at Nandi Hills this evening pic.twitter.com/KaMN7zBKAJ
— ANI (@ANI) February 20, 2022