ICC World Cup 2023 : क्रिकेटच्या मेळ्यात खुलवा तुमचा रंग, असे मिळवा तिकीट

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे भाग्य तुम्हाला पण मिळू शकते. आयसीसी वर्ल्डकपचा धुमशान आता सुरु होत आहे. यंदा भारतात क्रिकेटचा फीव्हर वाढणार आहे. हे क्रिकेट सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहेत. या सामान्याचे तिकीट मिळविण्यासाठी याठिकाणी नशीब आजमवायला काय हरकत आहे.

ICC World Cup 2023 : क्रिकेटच्या मेळ्यात खुलवा तुमचा रंग, असे मिळवा तिकीट
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 7:30 PM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : आता क्रिकेटच्या पंढरीत वारकरी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यंदा भारतात हा कुंभमेळा रंगणार आहे. आयसीसी मेन्स वर्ल्ड कप 2023 (ICC Men World Cup 2023) चा सोहळा भारतात होत आहे. ही तर क्रिकेटच नाही तर फॅन्ससाठी पण पर्वणी आहे. भारतात क्रिकेटचा नेहमीच जल्लोष दिसतो. क्रिकेटचा फीव्हर भारतावर चढणार आहे. भारतीयांच्या नसानसात क्रिकेटचा जलवा ओसंडून वाहणार आहे. भारताकडे या विश्वचषकाचं यजमान पद आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंतक्रिकेट सामने रंगणार आहेत. अर्थात क्रिकेट सामने (Cricket Matches) याची देही, याची डोळा पाहण्यासाठी चार महिन्यांपासूनच जय्यत तयारी सुरु झाली आहे. तरीही या सामान्याचे तिकीट मिळविण्यासाठी याठिकाणी नशीब आजमावता येईल.

10 टीमचा सहभाग

या विश्वचषकात दहा टीम सहभागी होतील. यामध्ये दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड, न्युझीलँड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणीस्तान, भारतासह इतर देशाचा समावेश आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हे सामने होणार आहेत. त्यासाठी सर्वच टीम उत्साहित आहेत. या विश्वचषकावर नाव करण्यासाठी या टीम आपआपसात भिडतील.

हे सुद्धा वाचा

आईसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप 2023 शेड्यूल

या विश्वचषकासाठी एकूण 48 सामने खेळण्यात येतील. यापूर्वीचा विजेता इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील चुरशीचा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये होईल. अनेक सामने दिवस-रात्रीत होतील.

असे करा तिकीट बुक

  1. आयसीसी विश्वकपाच्या तिकीटासाठी www.cricketworldcup.com ही अधिकृत वेबसाईट आहे
  2. राष्ट्रीय ध्वजावर क्लिक केल्यानंतर भारताचा पर्याय निवडा
  3. तिकीट बुकिंगसाठी सामना निवडा आणि शहराची निवड करा
  4. बुकिंग पोर्टलवर तुम्ही क्यूमध्ये असाल.
  5. वेब पोर्टलवर वेगवेगळ्या किंमतीवर आधारीत तिकीट निवडीचा पर्याय देण्यात आला आहे
  6. आवश्यकतेनुसार, तिकीट बुकिंगसाठी वैयक्तिक माहिती भरा
  7. तुमच्या इच्छेनुसार पेमेंटचा मोड निवडा
  8. पडताळणीसाठी ईमेल तपासा. विश्वचषक पाहण्यासाठी पॅकिंग करा

याठिकाणी रंगणार सामने

  1. भारत हा विश्वचषक 2023 चा यजमान असल्याने सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहे
  2. देशातील 10 महत्वाच्या शहरात हे सामने रंगणार आहेत
  3. MA Chidambaram Stadium- चेन्‍नई
  4. Arun Jaitley Stadium- नई दिल्‍ली
  5. Rajiv Gandhi International Cricket Stadium- हैदराबाद
  6. Wankhede Stadium- मुंबई
  7. Eden Gardens- कोलकता
  8. Narendra Modi Stadium- अहमदाबाद
  9. HPCA Stadium- धर्मशाला
  10. Ekana Stadium- लखनऊ
  11. M. Chinn swamy Stadium- बेंगळुरु
  12. MCA Stadium- पुणे
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.