Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

उन्हाळाच्या दिवसात लोक शक्कल लढवून विविध पेय, आईस्क्रीम तयार करत असतात. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रीमवर केले जाणारे प्रयोग... सध्या असंच इडलीचं आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा...
इडली आईस्क्रीम
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:03 PM

मुंबई : उन्हाळा (Summer) सुरू झालाय. अश्यात थंडाव्यासाठी आईस्क्रीम (ice cream) खाल्लं जातं. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले असतील. रस्त्यावर मिळणाऱ्या आईस्क्रीमची तर मजाच न्यारी. पण सध्या एक वेगळंच आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे आईस्क्रीम चक्क इडलीपासून बनवलं आहे. काही दिवसांआधी मिरचीचं आईस्क्रीमचं सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतं. पण आता हे आणखी एक आईस्क्रीम सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. आधी मिरची आणि आता इडलीचं हे आईस्क्रीम पाहून नेटकरी मात्र संतापलेत. त्यांनी आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…, असा सूर आळवला आहे.

इडली आईस्क्रीम

उन्हाळाच्या दिवसात लोक शक्कल लढवून विविध पेय, आईस्क्रीम तयार करत असतात. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रीमवर केले जाणारे प्रयोग… सध्या असंच इडलीचं आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इडली, सांबर आणि चटणीपासून बनवलेलं हे आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकरी काय म्हणतात?

thegreatindianfoodie नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.”इडली आईस्क्रीम. जगाला आणखी एक डायनॅमिक फूड दाखवण्याची वेळ आली आहे. माफ करा मित्रांनो…”, असं कॅप्शन याला देण्यात आलं आईस्क्रीमवर केले जाणाऱ्या या प्रयोगांवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी या प्रयोगाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी यावर टीका केली आहे. आमच्या आईस्क्रीमसोबत अश्या घाणेरड्या प्रयोगांचा खेळ करू नका, असं काहींनी म्हटलंय. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर अनेकजण संतापले आहेत. व्हीडिओवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘थोडी तरी लाज बाळगा. काहीही प्रयोग करत बसू नका.’

मिरची आईस्क्रीमची चर्चा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. कारणही तसंच खास आहे. हा व्हीडिओ आहे आईस्क्रिमचा हे आईस्क्रिम सध्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनलं आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवत आहे. ती व्यक्ती प्रथम ट्रेवर चार मिरच्या ठेवते आणि त्यावर चॉकलेट सिरप टाकते. मग ती व्यक्ती पुन्हा चॉकलेट सिरप आणि क्रीम टाकून मिरची बारीक कापून पातळ पेस्ट बनवते. थंड झाल्यावर रोल बनवून मिरचीसह सर्व्ह करते. व्हीडिओमध्ये काही महिला हे चिली आईस्क्रीम खाताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…

Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…

VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.