Viral News : या ठिकाणी भिंतीवर लघुशंका केली, तर तुम्हीचं व्हाल ओले, संतापलेल्या लोकांनी पाहा काय केलंय
कलरचा शोध लागल्यापासून रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण वारंवार त्याच समस्येला लोकांना सामोर जावं लागत होतं. काही लोकं दुर्गंधीमुळे आजारी सुध्दा पडली आहेत.
मुंबई : शहरात (City) आणि ग्रामीण भागात (rural area) लघुशंका (urinate) करण्याची ठिकाणं लोकांनी ठरवलेली असतात. शहरात शक्यतो झाडांचा आडोसा घेतला जातो, तर ग्रामीण भागात एसटी स्टॅंडच्या मागची बाजू लोकांनी ठरवलेली असते. त्यामुळे तिथल्या संपुर्ण परिसरात दुर्गंधी असते. त्याचबरोबर मच्छरचे प्रमाण सुध्दा अधिक असते. आता भींतीवर लघुशंका करणारी लोकं स्वत:चं ओली होणार असं दिसतंय. पाहा संतापलेल्या लोकांनी काय केलंय.
भींतीवर लघुशंका करणाऱ्या लोकांना कंठाळल्यामुळे लंडनमधील प्रशासनाने एक आयडिया शोधून काढली आहे. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा आहे. लंडन शहरातील भींतीवरती सगळीकडे लघुशंका प्रतिबंधक कलर लावण्यात येणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती भींतीवर लघुशंका करायला गेल्यास ती स्वत:चं ओलीहोणार आहे.
ब्रिटनमध्ये लंडन हे शहर नाईटलाईफसाठी अधिक प्रसिध्द आहे. त्यामुळे अनेक लोकं दुसऱ्याच्या घरावरच्या भींतीवर लघुशंका करीत असल्याचं आढळून आलं आहे. या गोष्टीचा लोकांना वारंवार त्रास होत आहे. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेल्या कलरला एंटी-पी-कलर असं नावं देण्यात आलं आहे. लंडनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, लंडनमधील प्रत्येक घराच्या भींतीवर हा कलर लावण्यात येणार आहे.
कलरचा शोध लागल्यापासून रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण वारंवार त्याच समस्येला लोकांना सामोर जावं लागत होतं. काही लोकं दुर्गंधीमुळे आजारी सुध्दा पडली आहेत. जो कलर तयार करण्यात आला आहे, त्यावर पाणी अजिबात थांबत नाही. त्याचबरोबर त्यात काही अशी रसायनं वापरली आहेत, लघुशंका करणाऱ्याला अधिक त्रास होईल.