नशीब असावं तर असं, एकाच कुटुंबातील तिघांना लागली प्रत्येकी 41 लाखांची लॉटरी; नेमकं काय घडलं ते वाचा
एकाच कुटुंबातील चक्क तिघांना प्रत्येकी 41 लाख रुपयांची लॉटरी लागली. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. सध्या या भाग्यवान कुटुंबाची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
कुणाचे नशीब कधी भरभराट करेल हे सांगता येत नाही. कुणाला आर्थिक भरभराटीचा मार्ग सांगणारा गुरु भेटेल तर कुणाच्या नशिबात लॉटरीच्या रूपात धनसंपदा लाभेल अनेक जण लॉटरीच्या मागे लागतात. आज ना उद्या आपणाला लॉटरी लागेल आणि आपण आपले अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे गणित अनेकांनी बांधलेले असते. पण सर्वांच्याच वाट्याला लॉटरीचे भाग्य लाभत नसते. नशिबाची साथ असेल तर एक काय कुटुंबातील सगळे सदस्य लॉटरीचे भाग्यवान विजेते ठरू शकतात याचीच प्रचिती सध्या एका कुटुंबाला आली आहे.
एकाच कुटुंबातील चक्क तिघांना प्रत्येकी 41 लाख रुपयांची लॉटरी लागली. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. सध्या या भाग्यवान कुटुंबाची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
लॉटरीवर भारतात अनेक ठिकाणी बंदी, पण…
भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉटरीवर बंदी आहे. अधिकृतरित्या लॉटरीचा व्यवसाय करण्यास मान्यता नसली तरी छुप्या पद्धतीने हा व्यवसाय चालतो ही गोष्ट वेगळी. परंतु परदेशात उघडपणे हा व्यवसाय करण्यास राजमान्यता आहे.
अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर लोक लॉटरी काढून आपले भाग्य आजमावतात. एकाच कुटुंबातील तिघांना तब्बल 41 लाखांची लॉटरी लागण्याचे भाग्य लाभले आहे. हे भाग्यवान कुटुंब आहे अमेरिकेतील.
तिघांनीही समान नंबर असलेली तिकिटे घेतली
मेरीलँडमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तिघा सदस्यांनी समान नंबर असलेली तिकिटे विकत घेतली होती. तिघांनाही आपला समान भाग्यवान क्रमांक भरभराट येईल याचा दृढ विश्वास होता.
याच विश्वासातून तिघांनी लॉटरीची तिकिटे खरेदी केली आणि नशिबानेही त्यांना चांगली साथ देऊन त्यांची स्वप्नपूर्ती केली. तिघांनाही प्रत्येकी 41 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्याचे पाहून कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
भाग्यवान विजेता ठरलेल्या कुटुंबाने 13 ऑक्टोबरला लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. तिघांनीही पाच, तीन, आठ चार असे शेवटचे सिरियल्स क्रमांक असलेली तिकिटे निवडली होती.
सुरुवातीला 61 वर्षीय व्यक्तीने हॅमस्टेड येथून एक डॉलरला तिकीट खरेदी केले. त्या पाठोपाठ त्यांची 28 वर्षांची मुलगी आणि 31 वर्षांच्या मुलग्याने एकाच दुकानातून समान सिरीयल क्रमांक असलेली तिकिटे खरेदी केली.
विजेत्या कुटुंबाची अमेरिकेत चर्चा
समान क्रमांक असलेली तिकिटे खरेदी करण्याचा त्यांचा हा निर्णय नशिबाने योग्य ठरवला आणि त्यांच्या नशिबी आर्थिक सुबत्ता दिली. सध्या या भाग्यवान विजेत्या कुटुंबाची मेरीलँडसह संपूर्ण अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे. अनेक मीडिया हाऊसने देखील त्यांच्या नशिबाची ठळक हेडलाईन प्रसारित केली आहे.