Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईलच्या वेडापाई आपला जीव धोक्यात घालताना दिसतेय. (man busy in mobile falls in drain)

Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत 'असं' घडलं की व्हिडीओ व्हायरल
MAN FALLS IN DRAIN VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 7:36 PM

मुंबई : देशात मान्सूनची चाहूल लागली आहे. देशभरात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झालीये. पावसाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. मात्र, या सर्व व्हिडीओंमध्ये एक व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईलच्या वेडापाई आपला जीव धोक्यात घालताना दिसतेय. (man busy with his mobile in heavy rain suddenly falls in drain video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकताच मोठा पाऊस पडल्याचं दिसतंय. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे येथे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले आहे. पाऊस पडल्यामुळे येथे संपूर्ण रस्ता बंद पडला आहे. दुचाक्या, तसेच चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या व्यक्ती रस्त्यावरील पाणी कमी होण्याची वाट पाहत आहेत. पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला तर प्राण संकटात पडू शकतात, याची बहुदा या सर्वांना कल्पना असावी. मात्र, यामध्ये एक पठ्ठ्या कशाचीही पर्वा न करता थेट गुडघाभर पाण्यातून चालताना दिसतोय. ही व्यक्ती फक्त चालत नाहीये, तर त्याच्या हातातील मोबाईलमध्ये तो गुंग झाल्याचे दिसतेय.

पठ्ठ्या मोबाईलमध्ये दंग, नंतर थेट नाल्यात पडला

आजूबाजूला सगळे प्रवासी रस्त्यावरील पाणी ओसरण्याची वाट पाहत असताना व्हिडीओमधील मोबाईल हातात असलेली व्यक्ती कशाचीही पर्वा न करता पाण्यातून चालताना दिसतेय.  मोबाईलमध्ये चांगलाच दंग झाल्यामुळे तो कशाचीही पर्वा न करता पाण्यातून चालतोय. मात्र, याच वेळी मोबाईलमध्ये दंग असल्यामुळे तो समोर अचानकपणे नाल्यामध्ये पडला आहे. एवढेच नव्हे तर तो नाल्यामध्ये जवळजवळ संपूर्ण बुडाला आहे. नाल्यामध्ये पडलेला असूनसुद्धा या व्यक्तीला त्याच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसतेय. ही व्यक्ती आपला मोबाईल खराब होऊ नये म्हणून हात वर करताना व्हिडीओमध्ये दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान हा व्हिडीओ dennys_gonzalez85 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 29 एप्रिल रोजी शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर करताच, तो अत्यंत कमी वेळात व्हायरल झालाय. या व्हिडीओला पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच…

Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

(man busy with his mobile in heavy rain suddenly falls in drain video goes viral)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...