VIDEO | पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड, बॅटरी आणि मोटर लावून तयार केली इलेक्ट्रिक स्प्लेंडर
VIRAL VIDEO | एका व्यक्तीने आपल्या स्प्लेंडर बाईकचं इंजिन काढून तिथं चार बॅटऱ्या लावल्या आहेत. त्याचबरोबर बॅटरीला मोटार जोडली आहे. हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (social media) केव्हा काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकत नाही. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कोणी जुगाड करुन इलेक्ट्रीक स्कुटी तयार करीत आहे. सध्या एक नवीन जुगाड व्हिडीओ व्हायरल (Jugaad Video) झाला आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एकदम भारी असा जुगाड केला आहे. हे सगळं पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती चार बॅटरीच्या मदतीने कशा पद्धतीने इलेक्ट्रीक बाईक (Splendor Bike) तयार करीत आहे. तुम्हाला हा जुगाड (VIRAL VIDEO) पाहूण काय वाटलं आम्हाला नक्की सांगा.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्प्लेंडर गाडी इलेक्ट्रीक वर्जनसोबत उभी असलेली दिसत आहे. त्या व्यक्तीने पेट्रोलवरती चालणाऱ्या गाडीला लाईट चालणाऱ्या चार बॅटऱ्या जोडल्या आहेत. ती बाईक उत्तमरीत्या सगळीकडे जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचा हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे. त्या व्यक्तीला यापुढे बाईक चालवताना अधिक पेट्रोल लागणार नाही.
View this post on Instagram
हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती punjab_vibe_1313 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 80 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. लोक जुगाड करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करीत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी हा जुगाड पाहून डोक्याला हात लावला आहे. लोकांनी या जुगाडबाबत चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं मांडली आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, हा मुजस्मा कोणी बनवला आहे. दुसर्याने एकाने लिहिले की, पेट्रोल वाचवण्याची अप्रतिम युक्ती. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ही जनरेटर बाईक बनली आहे. या जुगाडबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून सांगा.