मुलबाळ होत नाही, एवढी चिंता नको, कारण ४ वर्ष या महिलेला मुलबाळ झालं नाही आणि आता…

तिचे लग्न झाल्यानंतर चार वर्षे काही ती आई बनू शकली नाही. त्यामुळे नाराज असतानाच ती गर्भवती राहीली. आता आपल्यालाही आता बाळ होणार अशी ती स्वप्न पाहू लागली. परंतू तिची प्रसूती झाली तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला..

मुलबाळ होत नाही, एवढी चिंता नको, कारण ४ वर्ष या महिलेला मुलबाळ झालं नाही आणि आता...
babyImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:49 PM

राजस्थान | 28 ऑगस्ट 2023 : आई बननं कोणत्याही महिलेचं स्वप्न असतं..आई बनण्यासाठी आणि मुलांचे भरणपोषण करण्यासाठी प्रत्येक मातृत्व आसुसलेलं असतं. आपलंही चारचौघासारखं मुलांनी घर भरलेलं असावं, असं प्रत्येक दाम्पत्याला वाटत असतं. परंतू हल्ली उशीरा होणारी लग्नं, ताणतणाव आणि वाढतं प्रदुषण यामुळे मुलं होणं दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. अशात जर चार वर्षे घरात पाळणा हलला नाही तर घरातील महिलेलाच लोक दुषणं देऊ लागतात. अशात एका दाम्पत्या लग्नानंतर चार वर्षे काही मुलबाळ होत नव्हतं. परंतू त्यानंतर जे झालं त्यानं घरात तारांबळ उडाली.

तिचे लग्न झाल्यानंतर चार वर्षे काही ती आई बनू शकली नाही. त्यामुळे नाराज असतानाच ती गर्भवती राहीली. आता आपल्यालाही आता बाळ होणार अशी ती स्वप्न पाहू लागली. परंतू तिची प्रसूती झाली तेव्हा तिला चक्क चार गोंडस बाळं झाली. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामधील वजीरपूरा गावात ही आगळी घटना घडली आहे.  लग्नानंतर तिला चार वर्षे मुल होत नव्हतं. परंतू आता एकसाथ चार बाळं जन्माला आल्याने हे दाम्पत्य आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहेत. एका खाजगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी प्रसव कळा सुरु झाल्याने या महिलेला भरती करण्यात आले होते. डॉक्टर शालीनी अग्रवाल यांनी सांगितले की या चारही बाळांचे प्रकृती उत्तम आहे.

या चार बाळांची तब्येत ठणठणीत आहे –

rajasthan tonk

rajasthan tonk

या आईला आणि तिच्या बाळांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे, ही महिला दोन महिन्यांची गर्भवती असताना डॉक्टरांनी तिच्या गर्भात चार भ्रूणांचा विकास होत असल्याचे तिला डॉक्टरांनी तपासून सांगितले होते. चार महिन्यानंतर गर्भपाताची शक्यता असल्याने तिच्यावर विशेष उपचार करण्यात आले होते. एखाद्या महिलेने चार मुलांना जन्म दिल्याची टोंक जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण आहे. या आधी दोन प्रकरणात एकात दोन नवजात बाळांची तर दुसऱ्या प्रकरणात एक नवजात बाळाचा जन्मानंतर मृत्यू झाला होता अशी माहीती उघडकीस आली आहे.

असा प्रकार दहा लाखात एक

मेडीकल सायन्सच्या इतिहासात जुळे किंवा तिळे होणे खूपच वेळा पाहायला मिळते. परंतू एकाच वेळी चार किंवा त्यापेक्षा मुले होणे विरळ आहे. डॉक्टरांच्या मते दहा लाख प्रसूती पैकी एखाद्यावेळी चार मुले एकाच वेळी जन्माला येते. अनेक वेळा चार मुलांपैकी एक किंवा दोन बाळं दगावण्याचाही धोका असतो. परंतू या प्रकरणात चारही बाळांची प्रकृती उत्तम आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.