THIS IS IMPOSSIBLE! ऑटो रिक्षामधून उतरले तब्बल 27 जण; माणसं मोजता मोजता पोलिसही हैराण झाले
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. कोतवाली परिसरात वाहतूक पोलिसांना रही माणसांनी ओव्हरलोड झालेली रिक्षा दिसली. ही रिक्षा भरधाव वेगाने जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी हात दाखवूनही ड्रायव्हरने रिक्षा थांबवली नाही. अखेरीस वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत ही रिक्षा थांबवली. यानंतर पोलिसांना जे काही दिसले ते पाहून पोलिस शॉक झाले.
दिल्ली : लोकलमध्ये फोर्थ सीट, ऑटोमध्ये चौथी सिट, टमटम मध्ये दहा ते बारा सीट भारतीय प्रवाशांना एडजस्टमेंट करायची सवयच असते. मात्र, या सगळ्या एडजस्टमेंटचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशात( Uttar Pradesh) मोडीत निघाला आहे. एका या ऑटो रिक्षामधून (auto rickshaw)उतरले तब्बल 27 जण उतरले आहे. हे सर्व जण ऑटोमधून उतरत असताना त्यांची गिणती करता करता पोलिसही दमले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल(viral video) झाला आहे. एवढे जण या रिक्षात बसले कसे काय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना पडत आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. कोतवाली परिसरात वाहतूक पोलिसांना रही माणसांनी ओव्हरलोड झालेली रिक्षा दिसली. ही रिक्षा भरधाव वेगाने जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी हात दाखवूनही ड्रायव्हरने रिक्षा थांबवली नाही. अखेरीस वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत ही रिक्षा थांबवली. यानंतर पोलिसांना जे काही दिसले ते पाहून पोलिस शॉक झाले.
अरे ही रिक्षा आहे की ट्रक? इवल्याशा रिक्षात बसले २७ जण, फतेहपुरमधील हा प्रकार पाहून पोलीसही हादरले. pic.twitter.com/h6yL8aTz4A
— Mandar (@mandar199325) July 11, 2022
पोलिसांनी लोकांना रिक्षातून खाली उतरायला सांगीतले असता सर्व पोल खोल झाली. एक एक करुन रिक्षामधून तब्बल चालकासह तब्बल 27 जण खाली उतरले. माणसं मोजता मोजता पोलिस देखील हैराण झाले.
यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील बिंदकी कोतवाली परिसरातून ही रिक्षा निघाली होती. बिंदकी परिसरातील लालौली चौकात रिक्षा चालकाने रिक्षाचा स्पीड वाढवला. रिक्षा सुसाट वेगाने जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी धाव घेत रिक्षा थांबवली. यानंतर पोलिसांनी एक एक करून लहान मुले आणि वृद्धांना बाहेर काढले. पोलिसांनी मोजणी केली असता चालकासह 27 जण ऑटोतून बाहेर पडले. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी रिक्षा जप्त केली आहे.
वाहतूक पोलिस लोकांना ऑटोमधून लोकांना उतरवत असताना कोणीतरी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ऑटो रिक्षात 27 जण कसे बसले असतील याचीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणत शेअर देखील केला जात आहे. तसेच यावर मजेशीर कमेंट्सही येत आहेत.
मिड नाइट सेलसाठी मॉलमध्ये किड्या-मुंग्यांसारखी गर्दी! रात्री 12 वाजता एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले लोक
सेल मध्ये खरेदी करण्यासाठी संपूर्ण जगभरातील ग्राहक आघाडीवर असतात. मात्र, केरळ मधील नागरीकांना सगळ्यांचाच रेकॉर्ड मोडला आहे. केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये (Lulu Mall) मिड नाइट सेल ठेवण्यात आला होता. ही बातमी केरळमध्ये वाऱ्यासारखी पसरली. रात्री 12 वाजता लोक एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले. मॉलमधील गर्दी अनियंत्रीत झाली. मॉमधील या तुफान गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.