Indian Army’s Rescue operation! Malampuzha इथं 400 फूट घळीत अडकलेल्या तरुणास ‘असं’ वाचवलं, पाहा थरारक Video
Indian Army Rescue operation : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात मलमपुळा (Malampuzha) चेराड 400 फूट घळीत अडकलेल्या तरुणाचा जीव वाचला आहे. भारतीय सैन्यानं (Indian Army) बचावकार्य (Rescue operation) करत त्याचे प्राण वाचवले.
Indian Army Rescue operation : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात मलमपुळा (Malampuzha) चेराड 400 फूट घळीत अडकलेल्या तरुणाचा जीव वाचला आहे. भारतीय सैन्यानं (Indian Army) बचावकार्य (Rescue operation) करत त्याचे प्राण वाचवले. येथे 1000 फूट उंचीचा एक डोंगर आहे. यावर गिर्यारोहकांची ये-जा असते. किरकोळ कामे करून पोट भरणारा पण गिर्यारोहणाचा छंद असणारा आर. बाबू हा 23 वर्षांचा युवक गिर्यारोहक हा पहाड चढताना खाली कोसळला! दैव बलवत्तर म्हणून खाली 400 फुटावर असलेल्या एका चिंचोळ्या घळीमध्ये अडकून राहिला, जिथे जेमतेम उभे राहण्याची जागा होती. सोबतच्या मित्रांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले. पण बाबूपर्यंत पोहोचणे अशक्य होते. हे तरूण पहाड उतरून खाली गावात पोहोचले आणि सुरू झाले एक थरारक सुटका अभियान! परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने थेट मुख्यमंत्री पी. विजयन यांना कळवले आणि त्यांनी सैन्याला मदत मागितली. कारण हे काम कुणा येरागबाळ्याचे नव्हे, हे सर्वांच्या लक्षात आले होते!
आणलं गेलं विशेष विमान
या सर्व घडामोडीत सोमवारचा दिवस सरला. मंगळवारी भारतीय सैन्याचे कोस्ट गार्डचे चेतक हेलिकॉप्टर आले, खूप प्रयत्न करूनही केवळ हवामान खराब झाल्याने हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. सोमवारच्या रात्री आर. बाबू अन्न पाण्यावाचून तसाच घळीत अडकून उभा होता, अंधारात एकटाच! प्राण्यांची, सापांची भीती. मंगळवारची रात्रही अशीच जाणार! दिवसा ऊन आणि रात्री थंडी, पोटात अन्न नाही, पाणीही नाही! मदतीसाठी हाका मारून मारून घसा सुकलेला आहे! सैन्य अधिकाऱ्यांनी plan b अंमलात आणायचे ठरवले. काश्मीरच्या डोंगरदऱ्या, उंच कडे, चढण्या उतरण्याचा आणि लढण्याचा अनुभव असलेली एक सैन्य तुकडी missionवर हजर झाली. हे सैनिक AN-32 या विशेष विमानाने आणले गेले. शिवाय Mig-17 हेलिकॉप्टर्स तयार ठेवली गेली होती. हे सर्व एक जीव वाचवण्यासाठी! शेवटी सैन्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठीच कार्यरत असते ना!
अंधाराचे अडथळे
मंगळवारी रात्रीच्या अंधारात ही तुकडी 1000 फूट उंचीचा पहाड चढू लागली. जिथे बाबू अडकला आहे, तिथपर्यंत वरून खाली उतरत येणे गरजेचे होते आणि ते तसे उतरलेही! दोन सैनिक एका पाठोपाठ एक खाली उतरत होते, नायक बाला आणि सुभेदार दीपक यांना एवरेस्टवर चढाई करण्याचा अनुभव आहे. यातील एकाने माउंट एवरेस्ट सर केले होते! त्यांना बाबूच्या हाका ऐकू येत होत्या. त्यामुळे यांचाही आत्मविश्वास वाढत होता. त्यांनी ओरडून सांगितलं, हम इंडियन आर्मी है! चिल्लाना मत, थक जावोगे, हम पानी और खाना साथ लेकर आये है! घबराना नहीं!
पुन्हा कोसळला आणि…
मंगळवारी सकाळी आर. बाबू आपला अवघडलेला आणि दुखावलेला पाय जरासा लांब करण्याच्या प्रयत्नात आणखी वीस फूट खाली कोसळला होता! दैव दुसऱ्यांदा मेहेरबान झाले होते. वीस फुटावरही आणखी अशीच पण आणखी अरुंद जागा होती. आर. बाबूकडे मोबाईल होता. त्याने आपली सेल्फी काढून मित्रांना पाठवली! त्यामुळे लोकेशन समजण्यास मदत झाली. कमांडो बाबूपर्यंत पोहोचले.
दिली 45 तास मृत्यूशी झुंज
सैन्याला हे नेहमीचेच काम. पण सीमेवर शत्रूला हरवायचे असते, इथे नागरिकाचा जीव वाचवायचा होता. जरा जास्त काळजी घ्यायची होती! ही कामगिरी बघायला आता शेकडो लोक पायथ्याशी जमले होते. कमांडोंनी बाबूला पाणी, अन्न आणि मुख्य म्हणजे धीर दिला. बाबू थरथरत होता. दोघा कमांडोजनी बाबूला दोर बांधून वर चढवत चढवत नेले. खूप धोकादायक operation होते हे. खाली जाणे जास्त धोक्याचे होते आणि वर चढताना वरून दगड खाली डोक्यात पडण्याची शक्यता होती. शिवाय घाबरलेला बाबू अशक्तही होता, त्याला धीर देत देत, हळूहळू वर न्यावे लागले! सुटका होईपर्यंत बाबूने 45 तास मृत्यूशी झुंज दिली होती! सुरक्षित जागी पोहोचताच बाबूने कमांडोजना मिठी मारली. त्यांच्या गालाचे एखाद्या लहान बाळासारखे चुंबनही घेतले आणि भारत माता की जय! इंडियन आर्मी झिंदाबाद अशी आरोळी ठोकली. Operation successful! एका आईला आपला मुलगा परत मिळू शकला तो या धाडसी जवानांमुळे! (सौ. संभाजी गायके, भूषण नाईक)
आणखी वाचा :