जवानांनी स्वीकारलंय Online गाण्याचं चॅलेंज, पाहा कोण कसं गातंय? Viral Video पाहुन हसू येईल…
Indian army soldier video : भारतीय लष्करातील (Indian army) जवानांचे (Jawans) असे अनेक व्हिडिओ समोर आलेत. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ते बॉलिवूड (Bollywood) गाणे गाण्याचा प्रयत्न करत आहेत. जवानांनी ऑनलाइन (Online) चॅलेंज स्वीकारलेय.
Indian army soldier video : गेल्या एक-दोन महिन्यांत भारतीय लष्करातील (Indian army) जवानांचे (Jawans) असे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्यामुळे आपल्या उरात अभिमान आणि जोश संचारेल. उणे तापमानात डोंगराळ भागात उपस्थित जवान कसरत करताना दिसत होते, तर काही सैनिक बर्फाच्या वादळात जोमाने आपले कर्तव्य बजावत होते. असे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात लष्कराबद्दलचा आदर आणखीनच वाढला. लष्कराचे जवानही बर्फाळ मैदानात व्हॉलिबॉल खेळताना दिसले. अशा छोट्या-छोट्या खेळांनी मनोरंजन होते आणि त्यांना सकारात्मक ऊर्जाही मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते बॉलिवूड (Bollywood) गाणे गाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लष्कराच्या जवानांनी ऑनलाइन (Online) चॅलेंज स्वीकारून ते कॅमेऱ्यासमोर करण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरात गाण्याऐवजी…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते, की अनेक लष्करी जवान पायऱ्यांवर बसले आहेत आणि त्यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचे लोकप्रिय गाणे ‘सैयां’ गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैनिक गाणे सुरू करतात, तेव्हा लोक मोठ्या उत्सुकतेने पाहतात, परंतु ही प्रक्रिया जसजशी पुढे जाते तसतसे मागे बसलेले सैनिक थोडे घाबरतात आणि सुरात गाण्याऐवजी हसायला लागतात.
कैलाश खेर यांचे गाणे
कैलाश खेर यांच्यासारख्या उंच आवाजात ‘सैयां’ गाणे सगळ्यांनाच गाता येत नाही. हाय पिच गाणे म्हणायला सुरुवात करताच आवाज गडबड होऊ लागतो, असाच काहीसा प्रकार लष्कराच्या जवानांसोबत घडला आहे. हे मजेदार चॅलेंज पाहिल्यानंतर तुम्हीही हसून हसून जाल. एक-दोन लोक वगळता कोणीही ‘सैयां’ पूर्णपणे गाऊ शकत नाही. Naresh Limbu Tumbahangphe नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. हा एक मिनिट 43 सेकंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड पाहिला जात आहे.
आणखी वाचा :