#WorldWildlifeDay : काँग्रेसच्या Indira Gandhi यांच्या फोटोनंतर भाजपानं Share केला ‘हा’ Photo, सोशल मीडियावर चर्चा
World Wild life Day : जागतिक वन्यजीव दिन 2022च्या निमित्ताने काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) एक जुना फोटो (Photo) शेअर (Share) केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral)होत आहे. यावरून आता चर्चेला उधाण आले आहे.
World Wild life Day : जागतिक वन्यजीव दिन 2022च्या निमित्ताने काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) एक जुना फोटो (Photo) शेअर (Share) केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. चित्रात इंदिरा गांधींनी वाघाचा बछडा हातात घेतलेला दिसत आहे. मात्र, हा फोटो समोर आल्यानंतर ट्विटरवर लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. कोणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना वाघिण म्हणत आहेत, तर कोणी त्यांच्या कार्यकाळात लावलेल्या आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरत आहे. काँग्रेसने ट्विटरवर #WorldWildlifeDay या हॅशटॅगसह इंदिरा गांधींचा फोटो शेअर करत लिहिले, की पर्यावरण आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वारसा आपण पुढे नेऊ या. दरम्यान, या फोटोला प्रतिसाद म्हणून, एका यूझरने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाघाच्या बाळाला दूध पाजतानाचा फोटो शेअर केला आहे.
उलटसुलट चर्चा
यासोबतच काँग्रेसने इंदिरा गांधींना एक वन्यजीव प्रेमी म्हटले आहे. भारतातील जंगले आणि प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी धोरणात्मक चौकटीचा पाया रचला आहे. आता या पोस्टवरून ट्विटरवर वाद सुरू झाला आहे. एका यूझरने लिहिले आहे, की तुम्ही किती दिवस गांधींच्या नावाने मते मागत राहणार, तुम्हीही काहीतरी नवीन करा. यावर दुसऱ्या यूझरने ‘जोपर्यंत तुम्ही नेहरूंना प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या घालणार आहात तोपर्यंत’ असे उत्तर दिले आहे. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मुद्द्यावरूनही यूझर्सनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी, काही यूझर्सनी वाघ आणि वन संरक्षण कायदा 1980चा उल्लेख करून इंदिरा गांधींचे कौतुक केले आहे.
On #WorldWildlifeDay, let us carry forward the legacy of former PM Indira Gandhi in the preservation of environment & wildlife. A wild-life lover, she laid the foundation of much of the policy framework that protects India’s forests & animal species today. pic.twitter.com/kGScKCMbSU
— Congress (@INCIndia) March 3, 2022
the king is here pic.twitter.com/5rHC1kHUWQ
— Shubham Prajapati (@Shubham_RSS_) March 3, 2022
जागरुकता निर्माण करणे हा उद्देश
जागतिक वन्यजीव दिन 2022 दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. झपाट्याने नष्ट होत असलेले वन्यजीव आणि वनस्पतींच्या प्रजातींबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. कारण परिसंस्थेच्या समतोलासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. आजचा दिवस वन्यजीव आणि वनस्पतींना समर्पित आहे.
This is fine, we don’t want EMERGENCY imposed on political opponents ,journalists and common people like she did.
— Saavy?? (@saavy_m) March 3, 2022
You definitely are protector of wild life only difference is earlier it used to be tigers now there are wild boars, snakes, hyenas , stray dogs , donkeys and many more …
— Romica Bhat (@polticlbanjarn) March 3, 2022