Indian Railway | एक किमी अंतरासाठी ट्रेनला लागते ‘इतके’ डीझेल! वाचा ट्रेनच्या मायलेजविषयी…

भारतीय रेल्वे नेहमीच प्रगती करीत असून, आता दुर्गम भागातही रेल्वेच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

Indian Railway | एक किमी अंतरासाठी ट्रेनला लागते ‘इतके’ डीझेल! वाचा ट्रेनच्या मायलेजविषयी...
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:02 PM

मुंबई : भारतीय रेल्वे नेहमीच प्रगती करीत असून, आता दुर्गम भागातही रेल्वेच्या गाड्या पोहोचल्या आहेत. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरणही अतिशय वेगाने होत आहे. यामुळे डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे बर्‍याच प्रमाणात इंधनाची बचतही होत आहे. तसेच, ही इलेक्ट्रॉनिक सिस्टम डीझेल गाड्यांच्या तुलनेत अर्थात पूर्वीपेक्षा स्वस्त असल्याचे देखील म्हटले जात आहे. परंतु, आपण कधी विचार केला आहे का, की डिझेलवर ट्रेनचे मायलेज किती असेल आणि एक किलोमीटर धावण्यासाठी ट्रेनला किती लिटर डिझेल लागत असेल? (Indian Railway Train mileage and diesel capacity)

तसे, थेट रेल्वेचे मायलेज सांगणे खूपच अवघड आहे. कारण रेल्वेचे मायलेज मार्ग, प्रवासी ट्रेन, एक्सप्रेस किंवा रेल्वेच्या डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. चलातर, जाणून घेऊया की, ट्रेन किती मायलेज देते आणि एक किलोमीटर धावण्यासाठी किती लिटर डिझेल लागते…

किती असते ट्रेनचे मायलेज?

वृत्तानुसार, ज्या गाड्यांमध्ये 24-25 डबे असतात, त्यांना 1 किलोमीटरसाठी 6 लिटर डिझेल खर्ची पडते. त्याच वेळी, प्रवासी गाड्यांमध्ये अधिकचे डिझेल लागते. या गाड्यांना एक किलोमीटर धावण्यासाठी 5-6 लिटर डिझेलची आवश्यकता असते. याचे कारण म्हणजे, प्रवासी गाड्यांना पुन्हा पुन्हा थांबावे लागते.

जर, मालवाहू ट्रेनबद्दल बोलायचे झाले, तर या गाड्यांचे इंजिन वेगळे असते आणि त्याचे वजन देखील खूप जास्त असते. यामुळे या प्रकारच्या गाड्यांना अधिक डिझेल वापरले जाते. तथापि, या प्रकारच्या ट्रेनचे मायलेज प्रत्येक गाडीच्या अनुषंगाने बदलते, त्यामुळे मालवाहू रेल्वेचे मायलेज मोजणे अवघड आहे (Indian Railway Train mileage and diesel capacity).

इंजिनमध्ये फरक

रेल्वेच्या इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनच्या क्षमतेची तुलना करायचे म्हटल्यास, इलेक्ट्रिक इंजिन बाजी मारेल. रेल्वेचे डिझेल इंजिन जास्तीत जास्त 4500 हॉर्सपॉवरचे आहे, तर इलेक्ट्रिक इंजिन तब्बल 6000 हॉर्सपॉवरपर्यंत आहे. रेल्वेच्या डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनमध्ये 1500 हॉर्सपॉवर क्षमतेचा फरक आहे. इलेक्ट्रिक गाड्या यात तुलनेत अधिक यशस्वी होत आहेत.

वेळ वाचवण्यासाठी येत आहे आणखी एक तंत्र

आता भारतासहित अनेक परदेशी कंपन्या अशी इंजिन बनवत आहेत, जी विद्युतही असतील आणि आवश्यक असल्यास ती डिझेलवरदेखील चालवता येतील. जर हा प्रकल्प पूर्णपणे यशस्वी झाला तर ट्रेनच्या वेळेत 30 ते 50 मिनिटांचा फरक पडू शकतो, असे म्हटले जात आहे.

सध्या डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर सोयीनुसार चालवले जात आहेत. सहसा रेल्वे रुळांच्या आधारे गाड्या चालवल्या जात आहेत आणि त्यात डिझेल गाड्यांचादेखील समावेश आहे.

(Indian Railway Train mileage and diesel capacity)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.