Refuge App : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जग या देशाच्या पाठीशी उभे राहिले आहे. युक्रेनसाठी निधी उभारण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था एकत्र येत आहेत. युद्धामुळे लाखो लोक विस्थापित (Displace) झाले आहेत. इतर देशांमध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागत आहे. युद्धग्रस्त राष्ट्रातील पीडितांना मदत पुरवत, एका 15 वर्षांच्या भारतीय मुलाने आता शेजारच्या देशांमध्ये युक्रेनियन निर्वासितांना जोडण्यासाठी एक अॅप (App) तयार केले आहे. तेजस रविशंकर असे या मुलाचे नाव असून, तो सिकोइया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही. रविशंकर यांचा मुलगा आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर तेजसने अवघ्या दोन आठवड्यात हे अॅप तयार केले. तेजसने गुरुवारी गुगल प्ले स्टोअरवरील अॅपची लिंक ट्विट केली आणि लिहिले, ‘Launching Refuge – युक्रेनमधील विस्थापित लोकांना त्यांच्या घरातून मदत करण्यासाठी. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मदत देणारे हे आश्रयस्थान आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृपया हे रिट्विट करा.
– निर्वासितांसाठी सर्वात जवळचे मदत स्थान शोधण्यासाठी अॅपमध्ये संपूर्ण जगाचा नकाशा आहे.
नॅशनल आयडी – आधारित पडताळणी सुविधा, अन्न, राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आणि औषधे यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक यादी तयार करण्यात आली आहे.
– कोणत्याही गरजू व्यक्तीला फक्त दोन क्लिकमध्ये आवश्यक मदत मिळू शकते आणि अॅप 12हून अधिक भाषांमध्ये अनुवादितदेखील करते.
Launching Refuge – To help those displaced from their homes in Ukraine
Refuge is where individuals offering help connect with those who require help.
? Please Retweet to spread the word
Download for Android now: https://t.co/qjerMUgIn2 pic.twitter.com/ZGHRMYrtrf
— Tejas (@XtremeDevX) March 31, 2022
तेजसचे वडील जी. व्ही. रविशंकर यांनी ट्विटरवर शेअर केले आणि त्यांच्या मुलाच्या यशाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, ‘तरूण पिढीला अधिक बळ! वादावर नव्हे तर कार्यवाही करण्यावर त्यांचा विश्वास आहे. अशीच प्रगती कर @XtremeDevX’
युनायटेड नेशन्सचे निर्वासितांचे उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी यांच्या म्हणण्यानुसार, युद्धानंतर 10 दशलक्षाहून अधिक युक्रेनियन लोक विस्थापित झाले आहेत, त्यापैकी 3.5 दशलक्ष आधीच देश सोडून गेले आहेत आणि 6.5 दशलक्षांनी आपली घरे सोडली आहेत, उर्वरित युक्रेनमध्ये आहेत.