Bharat ki naari sab par bhaari! : कोरोना वडा कधी पाहिलाय किंवा खाल्लाय का? नसेल तर तुमच्यासाठी आणलाय हा खास Video
2019मध्ये कोरोनाव्हायरस(Corona Virus)च्या उद्रेकानंतर आपलं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. दोन वर्षांनंतरही या साथी(Pandamic)च्या आजारानं सर्वांनाच ग्रासलं आहे. अशात सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे.
Corona Vada : 2019मध्ये कोरोनाव्हायरस(Corona Virus)च्या उद्रेकानंतर आपलं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. दोन वर्षांनंतरही या साथी(Pandamic)च्या आजारानं सर्वांनाच ग्रासलं आहे. अशातही काहीजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतातच. काहींनी सर्जनशील पद्धतीनं अन्नपदार्थांचे प्रयोग केले आणि तेव्हापासून हे प्रकार काही थांबण्याचं नावच घेत नाहीत. असाच काहीसा प्रकार अलीकडच्या काळात सोशल मीडिया(Social Media)वर घडला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही क्षणभर धक्का बसेल. कोणाचं डोकं कसं चालेल, हे सांगता येणार नाही, असंच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर म्हणाल.
एकानं बनवली होती मिठाई
तुम्हाला आठवत असेल, 2020मध्ये कोलकाता येथील एका दुकानदारानं कोरोना संदेश स्वीट नावाची मिठाई बनवली होती, जी पाहून सोशल मीडियावरचे यूझर्स थक्क झाले होते. आता असाच एक पराक्रम एका महिलेनं केलाय. यामध्ये तिनं कोरोनासारखा दिसणारा वडा बनवलाय.
दिसतो कोरोनासारखा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला तांदळाचं पीठ मळून घेते आणि नंतर कांदा-टोमॅटो घालून बटाट्याचं सारण तयार करते. यानंतर हे सारण पिठाच्या आत भरून ती महिला कच्च्या तांदळानं ते कोट करते आणि वाफेवर चांगलं शिजवते आणि नंतर पाण्यात भिजवलेल्या तांदळानं गुंडाळते. आता जे काही तयार झालं, ते अगदी कोरोना विषाणूच्या स्पाइक्ससारखं दिसतं..
ट्विटरवर शेअर
Twitterवर Mimpi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की कोरोना वड़ा, भारत की नारी सब पर भारी.’ याला पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक यूझर्सनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Corona vada! Bharat ki naari sab par bhaari! .@arindam75 pic.twitter.com/sf1zoLPih2
— Mimpi? (@mimpful) January 19, 2022
‘वडा खूप चविष्ट’
एका यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, की हा वडा खूप चविष्ट दिसतोय, खाल्ल्यानं कोरोना होणार नाही ना.’ तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, ‘जेव्हा कोरोना होईल तेव्हा कोरोना वडा बनवा. आणखी एकानं कमेंट केलीय, की कोरोनाला अशा प्रकारे पराभूत केलं जाऊ शकतं.’