भयंकर! लग्नासाठी ‘या’ देशात होतं मुलींचं अपहरण, वाचा सविस्तर
अनेकदा लग्नातील जोडप्यांना विचित्र विधी देखील कराव्या लागतात. (Indonesia sumba island)
मुंबई : प्रत्येक देशात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. लग्नसोहळ्यात स्थानिक संस्कृतीला फार महत्त्व दिले जाते. अनेकदा लग्नातील जोडप्यांना विचित्र विधी देखील कराव्या लागतात. इंडोनेशियातील सुंबा बेट या ठिकाणी लग्नाबाबत एक विचित्र परंपरा आहे. या ठिकाणी लग्नासाठी मुलींचे अपहरण केले जाते. या अनोख्या प्रथेमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रथेला आळा घालण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न होत आहेत. (Indonesia sumba island girls are kidnapping for marriage)
इंडोनेशियातील सुंबा बेट या ठिकाणच्या लग्नाच्या या प्रथेला येथे ‘कावीन टांगकॅप’ म्हणतात. गेल्यावर्षी बीबीसीच्या माध्यमातून हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रथेची नेमकी सुरुवात कधी झाली, कुठे झाले, याची कोणी सुरुवात केली? याबद्दल अनेक वाद आहेत. या प्रथेनुसार लग्नाची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती, त्याचे मित्र किंवा कुटुंब कोणत्याही महिलेचे जबरदस्तीने अपहरण करु शकतात.
सरकारकडून कडक बंदी
या प्रथेबद्दल संपूर्ण सुंबा हे गाव एकमत आहे, असे नाही. यासाठी अनेक महिलांनी याविरोधात लढा देत मोहिम राबवली होती. तसेच ही प्रथा थांबवावी, अशीही मागणी केली होती. गेल्यावर्षी दोन महिलांचे अपहरण केलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर सरकार या प्रथेबाबत सावध झाली होती. तसेच यावर कडक बंदीही घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुंबाच्या बऱ्याच भागात अजूनही प्रथा सुरु आहे.
लग्नासाठी अपहरण करण्यात आलेल्या एका मुलीने याबाबतची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचेही अशाचप्रकारे अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्या मुलीने मोठ्या हुशारीने तिच्या आईवडिलांना मॅसेज केला होता. त्यामुळे तिची सुटका झाली. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने तिचे अपहरण केले होते, त्याच्या घरी लग्नाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. तसेच तिचे अपहरण करणार व्यक्ती हा तिच्या वडिलांचा दूरचा नातेवाईक होता.
त्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या विधींसाठी काही जण तिची वाट पाहत होते. ती त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काहींनी तिथे गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम सुरु झाला. दरम्यान सुंबा बेटावर तीन धर्मांच्या प्रथेचे पालन करण्यात येते. या ठिकाणी इस्लाम आणि ईसाईसोबत ‘मारापू’ या धर्माचे पालन केले जाते. (Indonesia sumba island girls are kidnapping for marriage)
संबंधित बातम्या :
प्रसिद्ध ब्रँडेड टॉपचे अनोखे डिझाईन, किंमत पाहून व्हाल हैराण?
Budget 2021 Memes: मोदी सरकारच्या बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस