Indurikar Maharaj comedy Kirtan : मराठी (Marathi) व्हायरल व्हिडिओंमध्ये विनोदी (Funny) व्हिडिओ जास्त पाहिले जातात. त्यातही कीर्तनाचे आणि विनोदी व्हिडिओ म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar maharaj) यांचं… आता त्यांचं एक नवं कोरं असं एक कीर्तन व्हायरल झालंय. सुखी जीवनाचा मंत्र ते या कीर्तनात सांगत आहेत. कोणत्याही वादात माणसानं विशेषत: तरुणांनी पडता कामा नये, असं ते यात सांगत आहेत. तरुणांना आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला ते यात देत आहेत. कुठली झोपडी जाळली, काही केलं की लगेच सीसीटीव्ही तुम्हाला आधी कैद करेल मग जेल. तिथं तीन महिने जामीन नाही. त्यामुळे आता आंदोलनाचे दिवस राहिले नाहीत. या सर्वांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
तुफान कॉमेडी
दंगली, मोर्चा, आंदोलन अशा भानगडीत तरुणांनी पडू नये, नाहीतर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुखी जीवनाचे तीन मंत्रही सांगितले. अंगातली ताकद जपून वापरा, वादाचा मुद्दा येत असेल तर तिथं माघार घ्या विजय तुमचाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. शिक्षक-विद्यार्थी, नवरा-बायको अशी उदाहरणे देत त्यांनी उपस्थितांना हसवलं. यावेळी त्यांनी सांगितलेले तीन मंत्र कोणते, त्यासाठी त्यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ पाहावा लागेल.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर गावरान वादळ (GAVRAN VADAL) या चॅनेलवर हा कीर्तनाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. तर व्हिडिओखालील कमेंट्सही वाचण्यासारख्या आहेत. ‘सुखी जीवनाचे ३ कानमंत्र | इंदुरीकर महाराज किर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtan‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. (Video Courtesy – GAVRAN VADAL)
आणखी वाचा :