उद्योगपती रतन टाटा यांचे हृदय द्रवले, ट्वीटरवर पावसाळ्यात वाहनचालकांना दिला हा सल्ला

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे वाहनचालकांसाठी उद्योगपती रतन टाटा यांनी एक आवाहन केले आहे.

उद्योगपती रतन टाटा यांचे हृदय द्रवले, ट्वीटरवर पावसाळ्यात वाहनचालकांना दिला हा सल्ला
RATAN TATAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 5:49 PM

मुंबई : उद्योगपती रतन टाटा आणि त्यांच्या परिवाराचे देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. उद्योगपती रतन टाटा ( Ratan Tata ) नेहमीच त्यांच्या सामाजिक जाणीवेविषयी ओळखले जातात. टाटा यांनी समाजमाध्यमावर ( Social Media ) नेहमीच सामाजिक विषयावर आपले विचार मांडत असतात. त्यांनी आपल्या ट्वीटरवर हॅंडलवर ( Twitter )  एक वेगळाच संवेदनशील विषय मांडला आहे. त्यांची ही भावनिक पोस्ट साऱ्यानांच मनापासून भावली आहे. ट्वीटरवर या पोस्टला खूपच लाईक केले जात आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे वाहनचालकांसाठी उद्योगपती रतन टाटा यांनी एक आवाहन केले आहे. पावसाळ्यात त्यांचा हा संदेश खूपच महत्वचा मानला जात आहे. रतन टाटा यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवर वाहनचालकांसाठी हा संदेश दिला आहे. त्यात त्यांनी वाहनचालकांनी कार सुरु करण्यापूर्वी एकदा कारच्या खाली वाकून कोणता प्राणी आराम करत नाही ना याची काळजी घ्यायला सांगितले आहे. जर पावसामुळे कुत्रा किंवा मांजराने तुमच्या कारचा आधार घेतला असेल तर त्यामुळे तो प्राणी जखमी होऊ शकतो. त्यामुळे योग्यप्रकारे काळजी घेत कार सुरु करावी असे त्यांनी म्हटले आहे.

हेच ते रतन टाटा यांचे ट्वीट..

पावसात सर्रास मुके प्राणी कारचा आसरा घेत असतात. त्यामुळे कार सुरु करण्यापूर्वी एकदा कारच्या खाली वाकून तिच्या खाली कोणताही प्राणी नाही ना याची पाहणी करा असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्या प्राणी प्रेमामुळे त्यांच्या वेगळ्या स्वभावाची प्रचिती येते. त्यामुळे रतन टाटा मुक्या प्राण्याची देखील किती काळजी वाहतात हे स्पष्ट होत.

उद्योगपती रतन टाटा यांनी समाजमाध्यमावर नेहमीच मुक्या प्राण्यांविषयीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. एकदा त्यांनी रस्त्यावरील झोपलेल्या कुत्र्याला पाऊस लागू नये म्हणून त्याच्यावर आपली छत्री धरणाऱ्या एका छत्रीधारी तरुणाचा फोटो समाजमाध्यमावर शेअर केला होता.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.