IPS D Roopa : IAS पूजा यांच्या जवळच्यांच्या घरी सापडले करोडो, महिला IPS म्हणाली तुम्ही मौन बाळगलं आहे याचा अर्थ…

डॉ.गौरव गर्ग नावाच्या युजरने ट्विट केले आहे. "असे अनेक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांना लाखो लोक ट्विटरवर फॉलो करतात. झारखंडच्या IAS पूजा सिंघलच्या प्रकरणावर ते मौन पाळत आहेत. हे असे का? हे मौन काही डावपेच आहे की लाजिरवाणेपणाने ते काही बोलत नाहीत? किंवा असे आहे की तुम्ही मला मदत करा आणि मी तुम्हाला मदत करीन." अशा प्रतिक्रिया आता लोकांच्या उमटू लागल्या आहेत.

IPS D Roopa : IAS पूजा यांच्या जवळच्यांच्या घरी सापडले करोडो, महिला IPS म्हणाली तुम्ही मौन बाळगलं आहे याचा अर्थ...
IAS पूजा यांच्या जवळच्यांच्या घरी सापडले करोडोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 8:17 PM

मुंबई : IAS पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) या झारखंड सरकारच्या (Jharkhand) खाण आणि भूविज्ञान विभागाच्या सचिव आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात छापा टाकल्यानंतर त्या सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे सोशल मीडियावर लोक इतर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनाही टार्गेट करत आहेत आणि त्यांच्या मौनावरही अनेक युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएस डी रूपा (IPS D Roopa) यांनी ट्विट केले आणि लिहिले की ” दुःखाची गोष्ट म्हणजे फार कमी लोक भ्रष्टाचाराचा निषेध करतात.” प्रत्यक्षात ईडीच्या छाप्यांमध्ये पूजा सिंघल यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सुमारे 19 कोटी रुपये रोख सापडले आहेत. यानंतर सोशल मीडियावर अनेक यूजर्स पूजा यांच्या बहाण्याने इतर अधिकाऱ्यांना घेराव घालत आहेत. डॉ.गौरव गर्ग नावाच्या युजरने ट्विट केले आहे. “असे अनेक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांना लाखो लोक ट्विटरवर फॉलो करतात. झारखंडच्या IAS पूजा सिंघलच्या प्रकरणावर ते मौन पाळत आहेत. हे असे का? हे मौन काही डावपेच आहे की लाजिरवाणेपणाने ते काही बोलत नाहीत? किंवा असे आहे की तुम्ही मला मदत करा आणि मी तुम्हाला मदत करीन.” अशा प्रतिक्रिया आता लोकांच्या उमटू लागल्या आहेत.

निर्लज्ज कृत्यासाठी मौन?

गौरवचे ट्विट शेअर करत, डी रूपा यांनी लिहिले, बरं कदाचित हे एखाद्याच्या निर्लज्ज कृत्यासाठी सन्माननीय मौन असेल.

हे सुद्धा वाचा

आयपीएस रुपा यांचे ट्विट

आयएएस अधिकाऱ्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चंकी नावाच्या युजरने लिहिले, “मी अनेक आयएएस अधिकाऱ्यांना ट्विटरवर पाहिले आहे. अनेक मुद्द्यांवर ते बोलत राहतात. कधी मीम्स पोस्ट करतात तर कधी आपले विचार ठेवून. मात्र आता पूजा सिंघलच्या प्रकरणावर ते सर्व लोक गप्प आहेत.”

रुपा यांचं दुसरं ट्विट

त्यानंतर आयपीएस डी रूप यांनी लिहिले की “लोक वैचारिक मतभेदांवर खूप भांडतात. कोणतीही विचारधारा पूर्णपणे योग्य किंवा चुकीची असू शकत नाही. खेदाची गोष्ट म्हणजे फार कमी लोक भ्रष्टाचाराचा निषेध करतात. ज्यावर खरे तर उघडपणे टीका करायला हवी. ते अनैतिक आहे म्हणून नाही तर ते बेकायदेशीर आहे म्हणूनही. जर तुम्ही शांत असाल तर याचा अर्थ तुम्हाला यात काही अडचण नाही.” डी रूपा या बंगळुरूच्या पोलीस महानिरीक्षक आहेत. त्या कर्नाटक हस्तकला विकास महामंडळाच्या एमडी देखील आहेत. डी रूपा यांना त्यांच्या चांगल्या कार्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकही मिळाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.