अग्नीसमोर सात नाही तर आता 8 वचनं घ्यावी लागणार, याशिवाय लग्न अपूर्ण! वाचा सविस्तर

| Updated on: Mar 05, 2021 | 11:55 PM

पण सध्या सोशल मीडियावर लग्नातील आठव्या वचनाबद्दलची चर्चा रंगली आहे. (Dipanshu Kabra Eight Fera)

अग्नीसमोर सात नाही तर आता 8 वचनं घ्यावी लागणार, याशिवाय लग्न अपूर्ण! वाचा सविस्तर
marriage
Follow us on

मुंबई : लग्न हे अतूट बंधन आहे. हिंदू धर्मातील लग्न हे सात वचनं दिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे लग्नातील सात फेऱ्यांना फार अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. पवित्र अग्नीसमोर सात फेरे घेत हा लग्नसोहळा पार पडतो. भारतीय लग्नात सात फेरे किंवा सात वचन दिले जातात. पण तुम्ही 8 व्या वचनाबद्दल ऐकलं किंवा वाचलात का? नाही ना. पण सध्या सोशल मीडियावर लग्नातील आठव्या वचनाबद्दलची चर्चा रंगली आहे. (IPS Dipanshu Kabra Eight Fera of Indian wedding)

सध्या सोशल मीडियावर या आठव्या वचनाला पसंती दिली जात आहे. हा आठवा फेरा प्रत्येक जोडपं त्याच्या त्यांच्या सोयीप्रमाणे घेते. कधीकधी काही नवविवाहित जोडपी एखाद्या सामाजिक मुद्द्यावर आठवा फेरा किंवा आठवं वचन घेतात. त्यामुळे त्या सामाजिक मुद्द्याला समर्थन दिले जाते. मात्र सध्या एका अनोख्या आठव्या वचनाची चर्चा होत आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचे हसू आवरता येत नाही.

सध्या सोशल मीडियावर एक अनोखे आठवे वचन ट्रेंड होत आहे. हे आठवे वचन IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्वीटरवर शेअर केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ट्वीट केलेला हा जोक इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्वीट केलेल्या फोटोत एक भटजी आणि नवविवाहित जोडपे दिसत आहे. हे जोडपे अग्निच्या समोर बसले आहेत. “लग्नावेळी सात फेरे पूर्ण झाल्यानंतर भटजींकडून हा विवाहसोहळा संपन्न झाला असे सांगतात. आता वराने (मुलाने) त्याचे एटीएम कार्ड वधू (मुलीला) द्यावे. त्यानंतर तिच्या कानात पासवर्ड सांगावा, असे सांगितले आहे. या फोटो ट्वीट करत 8 वा वचन… फक्त हसवण्यासाठी,” असे दिले आहे. (IPS Dipanshu Kabra Eight Fera of Indian wedding)

संबंधित बातम्या : 

OMG : 11 वीच्या विद्यार्थ्याने मेसेजवर केलं प्रपोज, उत्तर वाचून पोट धरून हसाल

JCB तर कंपनीचं नाव, मग ‘या’ मशीनला म्हणायचं तरी काय?

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांचे नवे गाणे