ढिंच्यॅक डान्स करणारा हा धडाडीचा आयपीएस अधिकारी ओळखलात का?
विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊण्टवरुन हा फोटो शेअर केला आहे. (Vishwas Nangare Patil College Days Dance Photo )
मुंबई : मुंबईचे सह पोलिस आयुक्त आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी महाविद्यालयीन दिवसातील एक फोटो शेअर केला आहे. तीस वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये डान्स करतानाचा हा फोटो आहे. नांगरे पाटलांचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. (IPS Officer Vishwas Nangare Patil College Days Dance Photo )
‘महाविद्यालयीन दिवस! मास्कशिवाय डान्स. 30 वर्षांपूर्वी’ असं कॅप्शन देत विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊण्टवरुन हा फोटो शेअर केला आहे. नांगरे पाटलांच्या समर्थकांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तुमच्या नृत्यकौशल्याची माहिती नव्हती, अशी कमेंट कोणी केली आहे, तर त्यांच्या कॉलेजमधील काही मित्रांनीही आठवणींना उजाळा दिला आहे.
College days! Dance without mask! 30 years back ?
Posted by Vishwas Nangre Patil on Friday, 16 April 2021
आर माधवन कॉलेजचा यार
सांगलीतील छोट्याशा खेडेगावात राहणारे विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजात गेले होते. या कॉलेजमध्ये नांगरे पाटलांना रुममेट मिळाला तो प्रख्यात अभिनेता आर माधवन. (R Madhavan) ‘मन में है विश्वास’ या पुस्तकात नांगरे पाटलांनी माधवनसोबत मैत्रीचे किस्से सांगितले आहेत.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना कॉलेजचा आदर्श विद्यार्थी कोण यासाठी बेस्ट राजारामीयन पुरस्कार दिला जात असे. यासाठी माधवन आणि विश्वास या दोघांची नावे आघाडीवर होती. यावेळी मात्र विश्वास नांगरे पाटलांनी बाजी मारली आणि मानाचा पुरस्कार पटकावला होता. (IPS Officer Vishwas Nangare Patil College Days Dance Photo )
त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा
“पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलेला माधवन मला रुमपार्टनर अलॉट झाला होता. माधवन इंग्रजीमध्येच बोलायचा. खूप गबाळा आणि अस्ताव्यस्त राहायचा. त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा. रुममध्ये जायला, नको नको व्हायचं. पण मनाने स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण, देखण्या माधवनबरोबर माझी गट्टी जमली.” असं नांगरे पाटील सांगतात.
इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे
“कॉलेजवरचा इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे असे. तो त्यांच्या गराड्यात अनेकदा दिसायचा, पण माधवन सभ्य विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीही, कोणाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन दिसला नाही. मुलींचा तो आदर करायचा. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, कँटीनमध्ये बसायचा, पण एखाद्या तेजस्वी योग्यासारखा.” अशा शब्दात नांगरे पाटलांनी मॅडीचं वर्णन केलं.
संबंधित बातम्या :
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’
(IPS Officer Vishwas Nangare Patil College Days Dance Photo )