Red Sandalwood Smuggler Arrested : ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळतेय. म्हणून मग रील्स बनवले जात आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. आता सिनेमा पाहून काहींनी चक्क गुन्हा केलाय. याच संबंधीचं एका आयपीएस अधिकाऱ्याचं ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. लाल चंदन तस्कर (Red Sandalwood Smuggler) पकडल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की पुष्पा रील लाइफमध्ये झुकणार नाही, पण रिअल लाइफमध्ये मात्र झुकणार आणि पकडलाही जाणार आता त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी प्रतिक्रियांचा पाऊसच पाडलाय. आम्ही बोलत आहोत यूपीच्या शामली जिल्ह्यातील एसपी सुकीर्ती माधव मिश्रा (SP Shamli Sukirti Madhav Mishra) यांच्याबद्दल. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. ‘पुष्पा’ रील लाइफमध्ये झुकणार नाही, तर रिअल लाइफमध्ये आता ‘पुष्पा’ झुकेल आणि पराभूतही होईल.
Smuggler inspired by ‘Pushpa’ movie attempts to smuggle red sandalwood, get caught by the police.
In reel life- ‘पुष्पा’ झुकेगा नहीं।
In real life – ‘पुष्पा’ झुकेगा भी, धरा भी जायेगा। pic.twitter.com/GH7SUArLaA— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) February 3, 2022
काय होतं ट्विटमागचं कारण?
नुकतंच महाराष्ट्र पोलिसांनी लाल चंदनाच्या तस्करीत सहभागी असलेल्या तस्करांना अटक केली आहे. हे तस्कर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात आलं. तस्करांनी ट्रकमध्ये लाल चंदन तर ठेवलंच होतं. मात्र याशिवाय अनेक फळांच्या पेट्याही वर ठेवल्या होत्या. ट्रकच्या वर कोरोना अत्यावश्यक उत्पादनांचं स्टिकरही लावण्यात आलं होतं. म्हणजेच पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याची पूर्ण तयारी होती.
फिल्म में जारी वैधानिक चेतावनी को अनदेखा करने का नतीजा ? https://t.co/6fY3jDFH2s
— VINAY JHARIYA? (@jhariya_er) February 4, 2022
नाकाबंदी करून जप्त केला ट्रक
पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती, त्यामुळे नाकाबंदी करून ट्रक जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली. पकडलेल्या याच आरोपीचा फोटो शेअर करत एसपी सुकीर्ती माधव मिश्रा यांनी एक ट्विट केलं आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.
ओर पुष्पा मार भी खायेगा ? https://t.co/IaQHgBjSFd
— sunil prajapati IAS ???? (@sunil_singhana) February 4, 2022
‘बिचारी पुष्पा’
आयएएस अवनीश शरण यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘बिचारी पुष्पा.’ आणखी एका यूझरनं सांगितलं, की त्यानं पोलिसांना फूल समजण्याची चूक केली. त्याला काय माहीत की पोलीस फायर आहेत? बहुतांश यूझर्सनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
Impact of movies by irresponsible directors & artists ?♂️
To all those kids do fan fights have to realize “movies are just entertainment ” nothing to do with real world ,
Actors & teams earns huge money ,we ? https://t.co/63wI2CVOqp— ganesh babu (@ganeshjayabalan) February 4, 2022