जेरुसलेम : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel palenstine conflict) यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु असून युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनकडून एकमेकांवर रोज प्राणघातक हल्ला केला जातोय. मिसाईल्स, बॉम्बगोळ्यांचा वर्षाव या भागात होताना दिसतोय. येथे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच लहान मुलंसुद्धा उघड्यावर आली आहेत. या युद्धादरम्यान काळजाचा थरकाप उडवणाऱ्या काही घटना समोर येतायत. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाची संहती सांगणारा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. एका दहा वर्षांच्या मुलीची कथा पाहून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत. (Israel Palestine conflict shown by 10 year old girl cried while tailing war story)
सोशल मीडियावर सध्या एका दहा वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीचे नाव Nadine Abdel-Taif असून ती रडताना दिसतेय. ही मुलगी राहते त्या परिसरातील सर्व घरं उद्ध्वस्त झाली आहेत. तिच्या आणि बाकीच्या लोकांची परिस्थिती सांगताना या मुलीला रडू कोसळलंय.
व्हिडीओमध्ये मुलगी युद्धामुळे तिच्या कुटुंबावर कशी अवकळा आली आहे, हे सांगत आहे. “या सर्व गोष्टींमुळे मला वैताग आला आहे. नेमकं काय करावं हे मला समजत नाहीये. मी काहीही करु शकत नाहीये. तुम्हाला हे ढिगारे दिसत आहेत. या पडक्या घराला मी ठीक करायला हवं का ? मी फक्त दहा वर्षांची आहे. मला यापेक्षा जास्त लढता येत नाहीये,” असे व्हिडीओतील मुलगी सांगत आहे.
पुढे ही मुलगी आपल्या स्वप्नांबद्दल सांगत आहे. “मला माझ्या लोकांची मदत करायची होती. त्यामुळे मी डॉक्टर होण्याचं ठरवलं होतं. मला अजून काय करावं हेसुद्धा माहिती नाही. या सगळ्या गोष्टींमुळे मला भीती वाटत आहे. मला माझ्या लोकांसाठी खूप काही करायचं आहे, पण मी कसं करु हे मला समजत नाहीये. मी फक्त दहा वर्षांची आहे,” असे ही मुलगी म्हणत आहे.
याच व्हिडीओमध्ये बोलताना ही दहा वर्षांची मुलगी रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत. पुढे बोलताना मुलगी जे सांगत आहे, ते तर अगदीच हादरवून टाकणारं आहे. “सध्याची जी परिस्थिती आहे, तिला मी रोज पाहतेय. हे सगळे पाहून आमच्यासोबत हे असं खरंच व्हायला पाहिजे होतं का ? असं मी माझ्या स्वत:लाच विचारते. आम्ही मुस्लीम असल्यामुळे ते आमचा द्वेष करतात, असं माझे पालक सांगतात. तुम्हाला माझ्या आसपास लहान मुलं दिसत असतील, हे सगळे लहान आहेत. तुम्ही यांच्यावर मिसाईल का डागत आहात ? हे सगळं जे चालू आहे, ते ठीक नाहीये,” असे मुलगी रडत रडत सांगत आहे.
पाहा व्हिडीओ :
“I don’t know what to do.”
A 10-year-old Palestinian girl breaks down while talking to MEE after Israeli air strikes destroyed her neighbour’s house, killing 8 children and 2 women#Gaza #Palestine #Israel pic.twitter.com/PWXsS032F5
— Middle East Eye (@MiddleEastEye) May 15, 2021
दरम्यान, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाची खरी परिस्थिती हा व्हिडीओ सांगत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. इंग्लंडचा युवा क्रिकेटर सॅम बिलिंग्स यानेसुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटी 10 लाख लोकांनी पाहिले असून अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Video | एवढ्या ‘एका कारणामुळे’ इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय
Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच
Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स
(Israel Palestine conflict shown by 10 year old girl cried while tailing war story)