या गावात राहायला फुकट घर, कायमस्वरुपी राहण्यासाठी 93 लाख मिळणार; फक्त एक छोटी अट…
इटली सरकारने लोकांना राहण्यासाठी आणि गावांचा विकास करण्यासाठी एक आकर्षक योजना आणली आहे. ओस पडलेल्या गावांमध्ये राहणाऱ्यांना 93 लाख रुपये आणि एक घर मोफत दिले जाईल. पण एक अट आहे, तुम्हाला कमीत कमी 10 वर्षे तिथे राहावे लागेल. ही योजना इटली आणि परदेशातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

जगात अनेक सुंदर देश आहेत. काही देशांमधील गावात तर कमालीच सौंदर्य आहे. पण अशा गावातील लोकसंख्या खूपच कमी होत आहे. अनेक देशात तर लोकसंख्या कमी झाल्याने अख्खं गावच खाली होत आहे. जपान आणि इटलीमध्ये तर तुम्हाला अशी असंख्य गावे सापडतील. अशा गावात लोकांना राहायचं नाहीये. लोक गाव सोडून शहरांकडे पळत आहेत. त्यामुळे या गावांमध्ये राहणारं कोणीच नाहीये. काही देशात तर असा गावांमध्ये लोक राहायला यावेत म्हणून त्यांना पैसे देऊन बोलावलं जात आहे.
इटलीच नव्हे तर अमेरिकेतही अशी काही गावं आहेत. त्या गावात लोकांना राहण्यासाठी सरकार बोलावत आहे. इटलीच्या तर एका डोंगराळ भागातील गावासाठी तर एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. या डोंगराळ भागातील गावात राहायला यावं म्हणून लोकांना बोलावलं जात आहे. या गावात लोक राहायला आले तर त्यांना राहण्यासाठी घर आणि 93 लाख रुपयेही दिले जात आहेत. पण इथे राहण्यासाठीच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
सरकार स्वत: पैसे देणार
इटलीचा उत्तरेकडील प्रांत त्रेनतिनो येथे ही ऑफर आहे. या गावाला ऑटोनॉमस प्रोव्हिन्स ऑफ ट्रेंटो या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी ओस पडलेल्या घरांमध्ये कोणी राहायला येत असेलल तर त्याला €100000 म्हणजे भारतीय चलनातील 92,69,800 रुपये देण्याची ऑफर सरकारने दिली आहे. या पैशाचा ब्रेक अप पाहिला तर ग्रँट म्हणून €80,000 म्हणजे 74,20,880 रुपये घराच्या डागडुजीसाठी आणि बाकीचे €20,000 म्हणजे 18,55,220 लाख रुपये घर खरेदीसाठी मिळणार आहेत.
ही अट मानावी लागेल
ही ऑफर केवळ इटलीच्याच नागरिकांसाठी नाही तर विदेशात राहणाऱ्यांसाठीही आहे. पण एक अट घालण्यात आली आहे. जी व्यक्ती ही डील करेल त्याला कमीत कमी या ठिकाणी 10 वर्ष राहावं लागणार आहे. जर त्यापूर्वीच ती व्यक्ती इथून गेली तर तिला ग्रँटचे सर्व पैसे परत करावे लागणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रदेशातील 33 गावांचा समावेश आहे. या 33 गावांमधील घरे खाली पडली आहेत. तिथे कोणीच राहत नाही. त्यामुळे सरकारने गावं भरण्यासाठी माणसांना ऑफर दिल्या आहेत.