#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral
ITBP Jawan kabaddi video : प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय लष्कराचे जवान (Jawans) सीमेवर उभे असतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) ITBP जवानांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये ते उणे तापमानातही कबड्डी खेळून मनोरंजन करताना दिसत आहेत.
ITBP Jawan kabaddi video : कडक ऊन असो वा कडाक्याची थंडी.. देशवासीय शांतपणे झोपू शकतात, ते सीमेवर असलेल्या जवानांमुळे… प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय लष्कराचे जवान (Jawans) सीमेवर उभे असतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) ITBP जवानांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये ते उणे तापमानातही कबड्डी खेळून मनोरंजन करताना दिसत आहेत. ज्या उंचीवर लोकांना श्वास घेणे कठीण होते, अशा स्थितीत ते कबड्डी खेळत आहेत. हा व्हिडिओ पाहून सैनिकांची ताकद आणि धैर्य किती आहे, याचा अंदाज येतो. हा व्हिडिओ रिट्विट करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लिहिले, की हे आमच्या प्राचीन खेळाचे सौंदर्य आहे. ते कुठेही, कधीही, कुठेही खेळा. खुद्द आयटीबीपीने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कडाक्याच्या थंडीतही उत्साह
व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की हिमवीर उत्साहाने भरलेला आहे आणि बर्फाळ टेकडीवर खेळत आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील बर्फाळ भागातील आहे. रविवारी जवानांनी अशा प्रकारे कबड्डी खेळण्याचा आनंद लुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कडाक्याची थंडी असतानाही जवान ज्या प्रकारे उत्साहाने भरलेले आहेत, ते कौतुकास्पद आहे. यामुळेच आयटीबीपीच्या जवानांना हिमवीर म्हणूनही ओळखले जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Full of josh, Playing in snow…#Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) playing Kabaddi in high Himalayas in Himachal Pradesh.#FitnessMotivation #FitIndia@KirenRijiju @ianuragthakur @FitIndiaOff pic.twitter.com/VjEEsuA2HL
— ITBP (@ITBP_official) March 13, 2022
आनंद महिंद्रांनी केले रिट्विट
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी रिट्विट करताना लिहिले आहे, की हे आपल्या प्राचीन खेळाचे सौंदर्य आहे की तो कुठेही, कधीही खेळला जाऊ शकतो. म्हणूनच मी या खेळाच्या पुनरुज्जीवनाचा प्रचार केला आहे. पण अट एकच, की तुम्हाला ‘वीर’ व्हावे लागेल!
सोशल मीडियावर कौतुक
हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये हजारो फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. अवघ्या 38 सेकंदांच्या या व्हिडिओला 1 लाख 41 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला 23शेहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 350हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.