ITBP योद्धा ज्युली आणि ओक्सानाच्या ‘या’ गोंडस पिल्लांना पाहिलं का? Video होतोय Viral

Julie & Oksana pups : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) यांच्या योद्धा श्वान ज्युली (Julie) आणि ओक्साना (Oksana) यांनी पंचकुला, हरियाणाजवळील नॅशनल ऑगमेंटेशन फॉर K9s (NAK) प्रकल्पात 13 लढाऊ पिल्लांना जन्म दिला आहे.

ITBP योद्धा ज्युली आणि ओक्सानाच्या 'या' गोंडस पिल्लांना पाहिलं का? Video होतोय Viral
गोंडस पिल्लांना जन्म देणारी योद्धा ज्युलीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:15 AM

Julie & Oksana pups : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) यांच्या योद्धा श्वान ज्युली (Julie) आणि ओक्साना (Oksana) यांनी पंचकुला, हरियाणाजवळील नॅशनल ऑगमेंटेशन फॉर K9s (NAK) प्रकल्पात 13 लढाऊ पिल्लांना जन्म दिला आहे. ज्युली आणि ओक्साना या कुत्र्यांच्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मालिनॉइसजातीच्या श्वान आहेत. संरक्षण करण्यात अत्यंत तरबेज अशा प्रजातीतील त्या आहेत. या कौशल्यासाठी त्या ओळखल्या जातात. आयटीबीपीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालिनॉइस K9 ज्युली ही नाटो सैन्यात वापरली जाणारी जात आहे. या प्राण्यांचे ITBP जवानांशी चांगले सूर जुळलेले आहेत. देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका ते बजावतात. उल्लेखनीय आहे की ITBP उत्कृष्ट कुत्र्यांना विशेष वार्षिक पदके देखील देते. ITBPने पिल्लांच्या जन्मानंतर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा ITBP जवान कुत्र्याच्या पिल्लांना K-9 फायटर मॉम ज्युलीकडे घेऊन जातात तेव्हा ती त्यांना प्रेमाने चुंबन करू लागते. यानंतर पिल्लू स्वच्छ करतात आणि त्याला खायला सोडतात.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर

आयटीबीपीने शेअर केलेल्या ज्युलीच्या व्हिडिओला यूझर्सकडून सोशल मीडियावर चांगली पसंती दिली जातेय. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्याला यूझर्स आवडीने पाहत असून शेअरही करत आहेत. अनेक श्वानप्रेमींना तर हा व्हिडिओ आवडला असून ते शेअरही करत आहेत.

मालिनॉइसविषयी…

मालिनॉइसहे लहान जर्मन शेफर्ड कुत्र्यासारखे दिसते. त्याची उंची 24 इंच आणि वजन 55 ते 60 पौंड (24-27 किलो) आहे. त्याचे पाय सरळ आहेत. मालिनॉइस हा एक मजबूत कुत्रा आहे, जो खराब हवामानात आपले काम चांगले करू शकतो आणि सर्व प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेतो. हा एक चांगला रक्षक कुत्रादेखील आहे, सर्वात जास्त बुद्धिमत्ता आहे आणि जर्मन शेफर्डपेक्षा अधिक ऊर्जावान आहे.

आणखी वाचा :

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video

Video: हे कुठलंच टेक्स्ट बुक नाही शिकवू शकलं असतं, ‘कोविड बॅच’ म्हणून हिणवणाऱ्यांना जोर का झटका

Viral Video | हुशार पोपटाची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.