Julie & Oksana pups : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) यांच्या योद्धा श्वान ज्युली (Julie) आणि ओक्साना (Oksana) यांनी पंचकुला, हरियाणाजवळील नॅशनल ऑगमेंटेशन फॉर K9s (NAK) प्रकल्पात 13 लढाऊ पिल्लांना जन्म दिला आहे. ज्युली आणि ओक्साना या कुत्र्यांच्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मालिनॉइसजातीच्या श्वान आहेत. संरक्षण करण्यात अत्यंत तरबेज अशा प्रजातीतील त्या आहेत. या कौशल्यासाठी त्या ओळखल्या जातात. आयटीबीपीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालिनॉइस K9 ज्युली ही नाटो सैन्यात वापरली जाणारी जात आहे. या प्राण्यांचे ITBP जवानांशी चांगले सूर जुळलेले आहेत. देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका ते बजावतात. उल्लेखनीय आहे की ITBP उत्कृष्ट कुत्र्यांना विशेष वार्षिक पदके देखील देते. ITBPने पिल्लांच्या जन्मानंतर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा ITBP जवान कुत्र्याच्या पिल्लांना K-9 फायटर मॉम ज्युलीकडे घेऊन जातात तेव्हा ती त्यांना प्रेमाने चुंबन करू लागते. यानंतर पिल्लू स्वच्छ करतात आणि त्याला खायला सोडतात.
आयटीबीपीने शेअर केलेल्या ज्युलीच्या व्हिडिओला यूझर्सकडून सोशल मीडियावर चांगली पसंती दिली जातेय. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्याला यूझर्स आवडीने पाहत असून शेअरही करत आहेत. अनेक श्वानप्रेमींना तर हा व्हिडिओ आवडला असून ते शेअरही करत आहेत.
मालिनॉइसहे लहान जर्मन शेफर्ड कुत्र्यासारखे दिसते. त्याची उंची 24 इंच आणि वजन 55 ते 60 पौंड (24-27 किलो) आहे. त्याचे पाय सरळ आहेत. मालिनॉइस हा एक मजबूत कुत्रा आहे, जो खराब हवामानात आपले काम चांगले करू शकतो आणि सर्व प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेतो. हा एक चांगला रक्षक कुत्रादेखील आहे, सर्वात जास्त बुद्धिमत्ता आहे आणि जर्मन शेफर्डपेक्षा अधिक ऊर्जावान आहे.