
पुणे : जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे चित्रपट शिवाय अनेक गोष्टींसाठी चर्चेत असतात. त्यांच्याबाबत विशेष म्हणजे त्यांची ओळख बॉलिवूडमध्ये (Bollywood) सर्वात उदारमतवादी म्हणून आहे. त्याचबरोबर मस्करी-प्रेमळ अशा विविधांगी स्वभावामुळे त्यांनी प्रत्येकावर एक वेगळी छाप उमटवली आहे. जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा मोठा मनाचा दिलदार माणूस असल्याचे सिध्द झालंय. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात जॅकी श्रॉफ यांच्या फार्म हाऊसवरती काम करणाऱ्या कामगाराचे वडिल वारले. त्यानंतर सर्वसामान्य कामगाराच्या पुणे (Pune) येथील घरी जाऊन जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांचं मन पुन्हा जिंकलं. या गोष्टीला 9 महिने 18 दिवस झाले असताना सुध्दा आजही या गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
ज्यावेळी जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या फॉर्म हाऊसला काम करणाऱ्या तरुण कामगाराचे वडिल वारल्याची बातमी समजली. त्यावेळी जॅकी श्रॉफ यांना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी थेट त्या कामगाराचे पुणे येथील चांदखेड गाव गाठले. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं जॅकी श्रॉफ यांनी सात्वन केलं. त्याचे सोशल मीडिया अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्याचबरोबर आजही ते फोटो व्हायरल होत आहेत. जॅकी श्रॉफचे फोटो पाहून त्याचे चाहते अधिक इमोशनल झाले होते. त्याचबरोबर तेव्हापासून जॅकी श्रॉफ यांची तारिफ होत आहे.
कामगाराच्या घरी पोहोचल्यानंतर जॅकी श्रॉफ फरशीवर बसले आहेत. कामगाराच्या परिवाराचे सांत्वन करीत असल्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होते. ते आजही व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्याची चर्चा सुध्दा पुन्हा सुरु झाली आहे.
आतापर्यंत जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधून लोकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर मिळालेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.