Video : मगरही होते कुणाचीतरी शिकार! पाहा ‘या’ दोन प्राण्यांमधला जीवन-मरणाचा सामना
Wild animals video : एक भीतीदायक प्राणी म्हणजे मगर (Crocodile). अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात मगर सिंह (Lion) किंवा बिबट्या (Leopard) यासारख्या जंगलातील धोकादायक प्राण्यांचीही शिकार करताना दिसते. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल व्हिडिओ मात्र उलट आहे.
Wild animals video : पाण्यातील सर्वात भीतीदायक प्राणी म्हणजे मगर (Crocodile)… पाण्यात असलेल्या मगरीशी टक्कर करणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्याचाच प्रकार आहे. एखाद्या प्राण्याला मगरीने जबड्यात पकडले की त्याची सुटका नाहीच. पाण्यात फक्त मगरींचे राज्य असते. प्रत्येक लहान-मोठा प्राणी मगरीपासून दूर राहतो. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये मगर पाण्यातून बाहेर येऊन एखाद्या प्राण्याची शिकार करते. अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात मगर सिंह (Lion) किंवा बिबट्या (Leopard) यासारख्या जंगलातील धोकादायक प्राण्यांचीही शिकार करताना दिसते. त्यानंतर ती या प्राण्यांना पाण्याखाली बुडवते आणि आपले पोट भरवते. मात्र, सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असलेला व्हिडिओ याच्या अगदी उलट आहे. इथे एक बिबट्या मगरीला धडा शिकवत आहे.
मगरीची शिकार करण्यासाठी उतरतो पाण्यात
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. यामध्ये एक बिबट्या पाण्यात शिरून ‘भयानक प्राण्या’ची शिकार करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एक मगर पाण्यातून बाहेर येऊन वाळूत विसावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक बिबट्या मगरीची शिकार करण्यासाठी पाण्यात उतरतो. व्हिडिओ पाहा –
मरेपर्यंत सोडत नाही
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की बिबट्या दुरूनच घात करून मगरीजवळ पोहोचतो आणि अचानक तिची मान पकडतो. बिबट्याने ज्या पद्धतीने मगरीची शिकार केली, त्यासाठी खूप धैर्य लागते. एखाद्याच्या घरात घुसून त्याला मारणे हे शौर्याचे कृत्य आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिबट्या मगरीला मरेपर्यंत दातांमध्ये धरून ठेवतो. (Video courtesy – National geographic)