हे तर काश्मीरपेक्षाही मनमोहक.. जयपूरमधील बर्फवृष्टीचे हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

| Updated on: Dec 19, 2023 | 3:44 PM

जयपूर शहरात बर्फवृष्टी झाली तर? हा विचारच प्रचंड सुखावणारा आहे. देशातील सर्वांत सुंदर शहरात बर्फवृष्टी झाली तर सर्वत्र नजारा कसा असेल, ते एका व्हिडीओतून पहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आतापर्यंत त्याला दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

हे तर काश्मीरपेक्षाही मनमोहक.. जयपूरमधील बर्फवृष्टीचे हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Jaipur
Image Credit source: Instagram
Follow us on

जयपूर : 19 डिसेंबर 2023 | तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ली बऱ्याच गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. सध्याच्या आर्टिफिशिअल इंटेलीजन्स म्हणजेच AI च्या विश्वात अशक्य ती गोष्ट शक्य होऊ लागली आहे. मानवी कल्पना अनेक नवी रुपं घेऊ लागली असून त्यातूनच नवनवीन गोष्टी पहायला मिळत आहेत. भारतात सहसा कुलू-मनाली, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणं सर्वसामान्य बाब आहे. मात्र जयपूरसारख्या शहरात बर्फवृष्टी होऊ लागली तर? ही गोष्ट खरी तर नाहीये पण AI च्या मदतीने जयपूरमध्ये बर्फवृष्टी झाल्यास ते शहर कसं दिसू शकेल, ते मात्र पाहता येतंय. एका डिजिटल आर्टिस्टच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याने AI च्या मदतीने हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून केवळ जयपूरवासीच नाही तर देशभरातील इतर नागरिकसुद्धा थक्क झाले आहेत.

@jaipurdronie नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जयपूरमध्ये बर्फवृष्टी झाली तर संपूर्ण शहर कसं दिसू शकेल, ते याच पहायला मिळतंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये शहरातील वर्ल्ड ट्रेड पार्क, जल महाल, जगतपुरा, सिटी पार्क, पांच बत्ती, इसरलाट, आर. टेक मॉल, जेएलएन मार्ग आणि अल्बर्ट हॉल म्युझियम या ठिकाणी बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसत आहे. व्हिडीओतील ही दृश्ये मंत्रमुग्ध करणारी आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 79 हजारांहून लाइक्स मिळाले आहेत. AI ने बनवलेले हे फोटो पाहून नेटकरी डिजिटल आर्टिस्टचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. खरीच बर्फवृष्टी झाल्यास जयपूर हा देशातील सर्वांत सुंदर शहर असेल, असं एकाने लिहिलं. तर ‘हा नजारा काश्मीरपेक्षाही अधिक मनमोहक आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘जयपूर हे शहर बर्फवृष्टीशिवायसुद्धा तितकंच सुंदर दिसतं’, असंही काहींनी लिहिलं आहे.