गर्दी, तरीही शिस्त; जपान मेट्रोचा ‘हा’ Video viral; यूझर्स म्हणतायत, म्हणूनच आहेत जगात सर्वात पुढे…
Japan metro : आपले जग आता मेट्रोमय होत आहे. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरत चालले आहे. लोकसंख्या (Population) वाढत असल्याने रस्त्यांवर गर्दीही वाढत आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) होत आहे. हा जपान मेट्रोचा व्हिडिओ आहे.
Japan metro : आपले जग आता मेट्रोमय होत आहे. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरत चालले आहे. लोकसंख्या (Population) वाढत असल्याने रस्त्यांवर गर्दीही वाढत आहे. त्यामुळे उड्डाणपूल तयार करण्यात आले. वाहतूककोंडीला तो एक पर्याय आहे. तर शहरांतर्गत वाहतुकीला मदत म्हणून मेट्रो काम करते. रस्त्याच्या वरून मेट्रोचा मार्ग जात असतो. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा परिणाम त्यावर होत नाही. शिवाय वेळ वाचतो. प्रवासाचा एक सुंदर असा अनुभव घेता येतो. मुंबईसारख्या शहरामध्ये लोकसंख्या प्रचंड असल्याने तिथेही लोकलसोबत मेट्रो, मोनो रेल धावतात. लोकलची गर्दी पाहिली आहेच मात्र मेट्रोलाही चांगलीच गर्दी असते. पण ही स्थिती केवळ आपल्याच नाही, तर परदेशातही दिसून येते. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) होत आहे. हा जपान मेट्रोचा व्हिडिओ आहे.
आत ढकलतात कर्मचारी
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जपानमधील एक मेट्रोचे स्टेशन दिसत आहे. तिथे प्रवासी उभे आहेत. एक मेट्रो तेवढ्यात येते. थांबल्यानंतर त्यामधून प्रवाशांचा लोंढा बाहेर पडतो. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरचे प्रवासी आतमध्ये जातात. मात्र गर्दी एवढी असते, की प्रवाशांना आतही जाता येत नाही. त्यामुळे मेट्रोचे कर्मचारी या प्रवाशांना आतमध्ये ढकलतात. कारण त्याशिवाय मेट्रोचे दारही बंद होऊ शकत नाही.
फेसबुकवर शेअर
फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल लिडरशीर (Institute of Political Leadership) या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जिस जापान की भारत में इतनी तारीफ़ होती है वहाँ सुबह मैट्रो की हालत क्या होती है आप खुद ही देख लो।’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे, गर्दी असली तरी शिस्त आहे. काहींनी म्हटले आहे, की त्यांना त्यांच्या देशाचा अभिमान आहे.