JCB : काळ्या- पिवळ्या रंगाच्या जेसीबीचा आधीचा रंग माहितीये का? , त्याचा रंग बदलण्यामागे आहे रंजक कहाणी…
सध्या देशात बुलडोझर म्हणजेच जेसीबीचा मुद्दा गरम आहे. जेसीबी विषयीच सगळीकडे बोललं जातंय. समाजकारणापासून राजकीय वर्तुळातही हाच मुद्दा चर्चिला जातोय. बुलडोझरची कारवाई ट्रेंडिंग आहे. पण या जेसीबीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आधी वेगळ्या रंगात दिसणाऱ्या या जेसीबीचा रंग आता बदलला आहे.
मुंबई : सध्या देशात बुलडोझर (Bulldozer) म्हणजेच जेसीबीचा मुद्दा गरम आहे. जेसीबी (JCB) विषयीच सगळीकडे बोललं जातंय. समाजकारणापासून राजकीय वर्तुळातही हाच मुद्दा चर्चिला जातोय. बुलडोझरची कारवाई ट्रेंडिंग आहे. सगळ्यात आधी उत्तर प्रदेशामध्ये बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.मग मध्यप्रदेशातील जहांगीरपुरी हिंसाचार आणि दिल्लीत बुलडोझरची कारवाई यामुळे हॅशटॅग बुलडोझर सध्या ट्रेंड होतोय. पण या जेसीबीचा इतिहास (JCB History) तुम्हाला माहिती आहे का? आधी वेगळ्या रंगात दिसणाऱ्या या जेसीबीचा रंग आता बदलला आहे.
जेसीबीचा आधीचा रंग
डीएनए या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आधी जेसीबीचा रंग पांढरा आणि लाल होता. याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्यानंतर या कंपनीला रंगात बदल करावा, असं वाटू लागलं. तेव्हा त्यांनी काही वर्षांनी जेसीबीचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला.
आताचा रंग
जेसीबी मशिनने विविध प्रकारचं खोदकाम केलं जातं. पण काहीवेळा रात्रीच्या वेळी काम सुरू असेल तर ही मशीन दुरून दिसायची नाही. मग कंपनीच्या लक्षात आलं की आपण आपल्या उत्पादनाचा रंग बदलायला हवा. तेव्हा त्यांनी जेसीबीचा रंग बदलून पिवळा आणि काळा केला. ज्यामुळे अंधारातही ही मशीन ओळखू येऊ लागली.
जेसीबी ही ब्रिटीश कंपनी आहे. ही कंपनी शेती, बांधकाम या क्षेत्रांशी संबंधित मशनरीचं उत्पादन करते. या कंपनीची स्थापना 1945 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय स्टॅफोर्डशायर, इंग्लंडच्या रोचेस्टर भागात आहे. आता त्याचे जगभरातील अनेक देशांमध्ये कारखाने आहेत. या कंपनीच्या उत्पादनांची आता भारतातही निर्मिती होते.
विशेष, लक्षवेधी बाब म्हणजे जेसीबी हे मशीन नसून कंपनीचे नाव आहे. हे कंपनीचे संस्थापक जोसेफ सिरिल बॅमफोर्ड यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या नावाची आद्यक्षरे घेऊन जेसीबी हे नाव तयार झाले आहे. तर बॅकहो लोडर असं या मशीनचं नाव आहे.
संबंधित बातम्या